बंगळुरू, कर्नाटक - शहरामध्ये सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले Bangalore city flooded आहे. आंतरराष्ट्रीय सुविधा असलेल्या बंगळुरू विमानतळावर Bangalore Airport सर्वत्र पाणी साचले आहे. प्रवाशांना त्या पाण्यातूनच वाट काढत जावे लागत असल्याचे चित्र विमानतळावर दिसत Waterlogging in Bengaluru airport आहे.
बंगळुरू शहरात सततच्या मुसळधार पावसाने पाणी साचले आहे. शहहात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणवले जाणारे बंगळुरू विमानतळही याला अपवाद ठरलेले नाही. विमानतळावरही सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. देशविदेशातून येणारे-जाणारे प्रवासी याच पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. यामुळे काही प्रवासी वैतागले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशी अवस्था असेल तर शहरातील रस्त्यांची स्थिती विचारायलाच नको, असे उद्विग्न प्रतिक्रिया ट्विटरवर प्रवासी देत आहे. एका ट्विटर युजरने तर ही लाजीरवाणी बाब असल्याचे सांगत, मला तर ही स्थिती पाहून रडावेसे वाटत आहे, असे म्हटले आहे.
बंगळुरूतील कोरमंगलासह अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले. मराठहळ्ळी-रेशीम मंडळ जंक्शन रोडजवळ एका व्यक्तीला पाणी साचलेल्या रस्त्यावर अडकल्याने स्थानिक सुरक्षा रक्षकांनी वाचवले. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मराठहळ्ळी-रेशीम मंडळ जंक्शन रोडवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
खूप पाऊस झाला आहे. सकाळी उठल्यावर पाणी साचलेलं पाहिलं. रस्त्यावर पाणी दुभाजकाच्या पातळीपर्यंत आलं होतं. त्यानंतर आम्ही रस्ता आणि तळघरातून पाणी उपसायला सुरुवात केली. माझ्या संपूर्ण तळघर पाण्याखाली बुडाले आहे, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
दरवर्षी हाच प्रकार - पाऊस पडल्यानंतर पाणी साचते आणि पाणी उपसावे लागते. कायमस्वरूपी उपाय नाही. रस्ता तयार होत असताना ड्रेनेज व्यवस्था नीट तयार केलेली नव्हती. यामुळे जनतेला अनेक अडचणी येतात, अनेक महिला प्रत्यक्षात घसरून पाण्यात पडल्या आहेत, असे दुसर्या स्थानिकाने सांगितले.
याआधी जुलैमध्ये कर्नाटकात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पुराचा सामना करावा लागला होता, त्यानंतर बचाव मोहीम आणि मदतकार्य करावे लागले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही केंद्राकडून आर्थिक मदत घ्यावी लागली.
हेही वाचा Sanjay Raut judicial custody : संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ