ETV Bharat / bharat

Andheri East bypoll: अंधेरी पोटनिवडणूकीसाठी आज मतदान! ऋतुजा लटकेंसमोर अपक्षांचे आव्हान

राजकीय चर्चेने प्रचंड गाजलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्या गुरुवार दि. (३ नोव्हेंबर)रोजी मतदान होणार आहे. भाजपने उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता केवळ औपचारिकता उरली आहे असे बोलले जात आहे. (Andheri East bypoll) महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील उमेदवार रुतुजा लटके यांचा निश्चित विजय मानला जात आहे. तर, दुसरीकडे अपक्षांहून अधिक मतदान हे नोटाला होण्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या आहेत आहेत.

author img

By

Published : Nov 2, 2022, 9:03 PM IST

Updated : Nov 3, 2022, 6:01 AM IST

Andheri East bypoll
अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी उद्या मतदान!

मुंबई - अंधेरी पोट निवडणुकीत कोण विजयी होईल कोण पराभूत होईल हा विषय निकालावरच आहे. मात्र, या निवडणुकीची जी राज्यभर आणि देशभर चर्चा झाली ती काही थांबण्याचे नाव घेत नव्हती. चिन्हापासून ते निवडणुक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यामध्ये नाट्यमय घडामोडी रंगल्या होत्या. ही निवडणुक शिंदे गट लढवणार की भाजप यावरून चर्चा झाली. त्यानंतर भाजपने उमेदवार उभा केला अन् झाली पुन्हा चर्चा सुरू. (Voting tomorrow for Andheri East by-election) ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपला इतर राजकी पक्षांकडून आवाहन करण्यात आले. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही याबाबत एक पत्र लिहले होते. अखेर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुक अर्ज मागे घेतला. मात्र, अंधेरी पोट निवडणुक आज गुरुवार दि. (३ नोव्हेंबर)रोजी होत आहे. शिवसेना (ठाकरे गट)यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात सहा उमेदवार निवडणुक लढवत असून, यामध्ये चार अपक्ष उमेदवार आहेत. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

लटके यांच्या विरोधात 6 उमेदवार मैदानात - रुतुजा यांच्या विरोधात सहा उमेदवार असून त्यापैकी चार अपक्ष आहेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी येथून उमेदवारी दिली आहे.

या सात उमेदवारांमध्ये होणार लढत

1) ऋतुजा रमेश लटके - महाविकास आघाडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

2) बाला व्यंकटेश विनायक नाडार - आपकी अपनी पार्टी, पीपल्स

3) मनोज श्रवण नाईक - राईट टू रिकॉल पार्टी

4) मीना खेडेकर - अपक्ष

5) फरहाना सिराज सय्यद - अपक्ष

6) मिलिंद कांबळे - अपक्ष

7) राजेश त्रिपाठी - अपक्ष

पटेल यांचा अर्ज मागे - सुरुवातीला भाजपने माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना या जागेवरून उमेदवारी दिली होती. मात्र, ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपला इतर राजकी पक्षांकडून आवाहन करण्यात आले. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही याबाबत एक पत्र लिहले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या परंपरेचा आदर करत भाजप दिवंगत खासदार किंवा आमदाराच्या कुटुंबीयांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही, असे सांगत भाजपने आपला उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली.

अनिल परब यांचा आरोप - आता ही निवडणूक शिवसेना उद्धव गटाच्या बाजूने जवळपास एकतर्फी होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, तरीही ऋतुजा लटके यांच्या विरोधात 6 उमेदवार मैदानात असल्याने नेमकं मतदान केंद्रावर काय घडेल हे देखील पाहणे महत्वाचे आहे. त्यातच शिवसेनेचे अनिल परब यांनी RIP आठवले गटावर त्यांचे कार्यकर्ते नोटाला मतदान करा असा प्रचार करत असल्याचा आरोप केल आहे. त्यांच्या या आरोपानंतर या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्ष नोटाला अधिक मतदान होईल अशा चर्चा होत आहेत.

मतदार संघातील संभाव्य स्थिती - या मतदार संघात पुरुष मतदार १ लाख ४६ हजार ६८५ असून महिला मतदार १ लाख २४ हजार ८१६, दिव्यांग मतदार : ४१९ तर तृतीय पंथीय मतदार: १ (एक) आहे. तर एकूण मतदार २ लाख ७१ हजार ५०२ आहेत. एकूण मतदान केंद्रे : २५६ असून ही मतदान केंद्रे ३८ ठिकाणी कार्यरत असून २५६ मतदान केंद्रांपैकी २३९ मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत १७ मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी उद्वाहन अर्थात लिफ्ट ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व ठिकाणी व्हिल चेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

सखी मतदान केंद्र - भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्यूकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र क्रमांक ५३ हे सखी मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रामध्ये एकूण १ हजार ४१८ मतदार असून यापैकी ७२६ महिला; तर उर्वरित ६९२ मतदार हे पुरुष आहेत. या केंद्रातील महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सजविण्यात आलेल्या या मतदान केंद्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी महिला असणाार आहेत.

कायदा व सुव्यवस्था - मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था सुयोग्य प्रकारे राहावी , यासाठी सुमारे १ हजार १०० इतके अधिकारी / कर्मचारी कार्यरत असणार आहे. यामध्ये मुंबई पोलिस दल, राखीव पोलिस दल, निमलष्करी दल , गृह रक्षक दल इत्यादींच्या मनुष्य बळांचा समावेश असणार आहे.

पोटनिवडणुकीतून भाजपची माघार - अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीत ऋतुजा लटकेंनी निवडणूक लढवू नये, यासाठी अनेक अडथळे आणले. राजीनामा मिळवण्यासाठी कोर्टात जावे लागले. न्यायालयाने फटकारल्यानंतर लटकेंचा राजीनामा मंजूर झाला. दोन्ही कडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत नामांकन अर्ज भरला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा ही निवडणूक केंद्रबिंदू ठरली होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी भाजपचे कान टोचले. तर मन​​से प्रमुख राज ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र दिले होते. भाजपने यानंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

ही माझ्या पतीच्या कामाची पोचपावती- ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी यावर प्रतिक्रिया दिली. पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सर्व नेत्यांचे आभार. आतापर्यंत अंधेरी पोट निवडणुकीच्या प्रचारात साथ देणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच पती रमेश लटके हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांनी या मैत्रीची कदर करत ही अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील अनुभवी नेते शरद पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला. या सर्वांची आभारी आणि कायम ऋणी राहीन, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले. तसेच प्रत्येक जण रमेश लटके यांच्या कामाचे कौतुक करत होता, तसेच ते आपले सहकारी होते, असे सांगत होता. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणे, ही माझ्या पतीने केलेल्या कामाची पोचपावती आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली त्यासाठी मी प्रत्येकाचे आभार मानते, असे ऋतुजा लटके यांनी सांगितले.

Last Updated : Nov 3, 2022, 6:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.