ETV Bharat / bharat

voting for 16 seats of rajya sabha : महाराष्ट्रासह चार राज्यातील राज्यसभेच्या 16 जागांसाठी मतदान सुरू - Voting

चार राज्यांतील राज्यसभेच्या ( rajya sabha election ) 16 जागांसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये ( Maharashtra ) धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. महाराष्ट्रातील सह, हरियाणातील दोन, कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी चार-चार जागांवरील उमेदवारांच्य भाग्याचा फैसला आज मतदानाद्वारे होणार आहे.

rajya sabha election
राज्यसभा निवडणूक
author img

By

Published : Jun 10, 2022, 11:25 AM IST

दिल्ली/मुंबई/बंगळुरू/चंदीगढ - राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election ) आज सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. महाराष्ट्र ( Maharashtra ), हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थानमधील 16 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज त्या त्या राज्यातील आमदार आपल्या मतदानाद्वारे ( Voting ) करणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांची निवड केली असून या संपूर्ण निवडणुकीचे व्हिडिओ चित्रिकरण केले जात आहे. ज्या प्रमुख उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पियुष गोयल, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मुकुल वासनिक, शिवनेचे संजय राऊत यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार सहज विजयी होतील, असे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली होती. त्यामध्ये 57 उमेदवार बिनविरोध निवडून आले. तथापि, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 16 जागांसाठी मतदान होत आहे.

आतापर्यंत बिनविरोध विजयी झालेल्यांपैकी १४ भाजपचे आहेत. पी चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचे चार उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात चार जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडूत द्रमुक आणि ओडिशात बीजेडीला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पार्टी, आरजेडी, तेलंगणा राष्ट्र समिती, एआयएडीएमकेचे प्रत्येकी दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. JMM, JD(U), SP आणि RLD आणि अपक्ष कपिल सिब्बल यांच्याकडून प्रत्येकी एक.

महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान - महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे राज्यात मतदान घ्यावे लागत आहे. सत्तारुढ महाविकास आघाडी आणि भाजपाच्या आमदारांचा घोडेबाजार होण्याचे आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजुंनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजपा), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय राऊत और संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (कांग्रेस) या सहा जागांसाठी मैदानात आहेत. यातील मुख्य लढत भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यामध्ये आहे.

एआयएमआयमचा आघाडीला पाठिंबा - महाराष्ट्रातमध्ये एआयएमआयम पक्षाचे दोन आमदार आहे. एआयएमआयम पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. या पक्षाचे दोन्ही आमदार काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांन मतदान करणार आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येकी एका उमेदवाराला काही मते कमी पडणार आहेत. अपक्ष आणि छोटे पक्ष कोणाच्या बाजुने मतदान करणार त्यावर शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांचे भवितव्य ठरणार आहे.

राजस्थानमधील चार जागांपैकी तीन जागांवर विजय निश्चित आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने तीन जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. तर, भाजप केवळ एका जागेवर निवडणूक लढवत आहे, चौथ्या जागेसाठी भाजपने अपक्ष आणि मीडिया व्यावसायिक सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला आहे. सुभाष चंद्रा आणि काँग्रेस यांच्यात येथे स्पर्धा होणार आहे.

एक जागा जिंकण्यासाठी 41 आमदारांच्या मतांची गरज आहे. सुभाष चंद्र यांना भाजपच्या तीस आमदारांचा आणि आरएलपीच्या तीन आमदारांचा पाठिंबा आहे. त्यांना विजयासाठी 8 मतांची गरज आहे. काँग्रेसच्या 8 उमेदवारांची मते आपल्याला मिळतील असा सुभाष चंद्रा यांचा दावा आहे. आता संपूर्ण भार 13 अपक्ष, 2 सीपीएम, 2 बीटीसी आणि एक आरएलडी आमदारांच्या हातात आहे.

हरियाणातील दोन जागांसाठीही मतदान होणार आहे. हरियाणात काँग्रेसने अजय माकन यांना एका जागेवर उभे केले आहे. भाजपचे उमेदवार कृष्णलाल पवार आहेत. तर, दुसऱ्या जागेसाठी भाजप दुसऱ्या अपक्ष उमेदवार आणि मीडिया बॅरन कार्तिकेय शर्मा यांना पाठिंबा देत आहे. हे प्रकरण अजय माकन आणि कार्तिकेय शर्मा यांच्यात अडकले आहे. येथे एक जागा जिंकण्यासाठी 31 मतांची आवश्यकता आहे

भाजप-जेजेपीकडे ५९ मते आहेत. भाजपचे ४० आमदार आहेत, जे त्यांचे उमेदवार कृष्णलाल पवार यांच्या विजयासाठी पुरेसे आहेत. युतीकडे 18 अतिरिक्त मते आहेत, ज्यामध्ये गोपाल कांडा, INLD पैकी दोन आणि सात अपक्षांचा पाठिंबा आहे. अशा प्रकारे अपक्ष कार्तिकेय शर्मा यांना 28 मते मिळू शकतात. कार्तिकेय शर्मा यांना विजयासाठी आणखी 3 मतांची गरज आहे. काँग्रेसकडे 31 आमदार आहेत पण पक्षांतराच्या भीतीने त्यांनी आपले 29 आमदार छत्तीसगडला हलवले होते.

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागा आहेत. येथे भाजपने तीन, काँग्रेसने दोन आणि जेडीएसने एक उमेदवार उभा केला आहे. आकड्यांनुसार भाजपच्या दोन आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जगेश थेट विजयी होतील. काँग्रेस नेते जयराम रमेश यांचाही विजय निश्चित आहे. चौथ्या जागेचा प्रश्न आहे. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपकडे 32, जेडीएसकडे 32 आणि काँग्रेसकडे 25 अतिरिक्त मते आहेत. अशा स्थितीत भाजपचे तिसरे उमेदवार लहरसिंग सिरोया, काँग्रेसचे उमेदवार मन्सूर अहमद खान आणि जनता दल सेक्युलरचे कृपेंद्र रेड्डी यांच्यात लढत होणार आहे. कर्नाटकातही क्रॉस व्होटिंगची भीती व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.