ETV Bharat / bharat

Virat Kohli Restaurant विराट कोहली सुरु करणार किशोर कुमारांच्या मुंबईतील बंगल्यात रेस्टॉरंट - विराट कोहली रेस्टॉरंट वन8 कम्यून

विराट कोहलीने प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गौरी कुंज या बंगल्याचा भाग त्याच्या मालकीच्या रेस्टॉरंट चेनमध्ये जोडण्यासाठी भाड्याने घेतला आहे. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कोहली लवकरच अमित कुमार यांच्या मालकीच्या बंगल्यात एक रेस्टॉरंट सुरू करणार आहे.

Virat Kohli Restaurant
Virat Kohli Restaurant
author img

By

Published : Sep 2, 2022, 4:57 PM IST

Updated : Sep 2, 2022, 5:14 PM IST

मुंबई - भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने Virat Kohli प्रसिद्ध गायक किशोर कुमार singer Kishore Kumar's यांच्या गौरी कुंज Gouri Kunj या बंगल्याचा भाग त्याच्या मालकीच्या रेस्टॉरंट चेनमध्ये जोडण्यासाठी भाड्याने घेतला आहे, असे मीडिया रिपोर्ट्सने शुक्रवारी सांगितले. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार Amit Kumar यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कोहली लवकरच अमित कुमार यांच्या मालकीच्या बंगल्यात एक रेस्टॉरंट सुरू करणार आहे.

  • Cricketer Virat Kohli to start a restaurant in the bungalow of Legendary singer late Kishore Kumar in Mumbai: Amit Kumar, Kishore Kumar's son

    (File Pics) pic.twitter.com/CR4fE5wqVj

    — ANI (@ANI) September 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमित कुमार यांनी एका मीडिया आउटलेटला सांगितले की, "आम्ही विराटला 5 वर्षांसाठी जागा भाड्याने दिली आहे." हा बंगला जुहू येथे आहे आणि क्रिकेटर त्याचा वापर त्याच्या रेस्टॉरंट्सच्या चेनचा एक भाग म्हणून करणार आहे. वन8 कम्यून ही विराट कोहलीची रेस्टॉरंट्सच्या चेन असून याचे नाव विराटच्या जर्सी क्रमांकावरुन घेण्यात आले आहे. किशोर कुमारचा मुलगा अमित यानेही काही महिन्यांपूर्वी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला आहे. दरम्यान, कंपनीच्या इंस्टाग्राम बायोमध्ये "Juhu, Mumbai #ComingSoon" असे लिहिण्यात आले आहे. विराट कोहलीच्या रेस्टॉरंट चेनचे दिल्ली, कोलकाता आणि पुणे येथे विविध फूड आउटलेट आहेत.

कोहलीच्या फलंदाजीचा विचार करता, आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण खेळीनंतर तो फॉर्ममध्ये आलेला दिसत आहे. त्याने हाँगकाँगविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 क्रिकेट विश्वचषकापूर्वी भारताच्या आवडत्या फलंदाजाला त्याचा सुवर्ण काळ पुन्हा प्राप्त होण्यास आता अवघ्या काही काळाची गरज आहे.

हेही वाचा - Virat Anushka Purchased Land : विराट अनुष्काने अलिबागमध्ये खरेदी केली 8 एकर जमिन, जाणून घ्या किंमत

Last Updated : Sep 2, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.