दुबई: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये दिसत आहे. कोहलीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक झळकावले आहे. त्याचबरोबर संपूर्ण आशिया चषक स्पर्धेतही त्याने आपली उपस्थिती कायम ठेवली होती. यामुळे कोहलीला आयसीसी टी-20 क्रमवारीत बंपर फायदा ( Kohli gains in ICC T20 rankings ) झाला आहे. त्याने 14 स्थानांनी झेप ( Virat Kohli rises 14 spots ) घेत 15व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. कोहलीने अलीकडेच आशिया चषक स्पर्धेत एकूण 276 धावा केल्या होत्या.
त्याने त्याच्या करिअरमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये पहिले शतक ( Virat first century in T20I ) झळकावले. कोहलीने हे शतक आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तो संयुक्त दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
-
Big rewards for star performers from the #AsiaCup2022 in the latest update of the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 📈
— ICC (@ICC) September 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details ⬇️ https://t.co/B8UAn4Otze
">Big rewards for star performers from the #AsiaCup2022 in the latest update of the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 📈
— ICC (@ICC) September 14, 2022
Details ⬇️ https://t.co/B8UAn4OtzeBig rewards for star performers from the #AsiaCup2022 in the latest update of the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 📈
— ICC (@ICC) September 14, 2022
Details ⬇️ https://t.co/B8UAn4Otze
सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर -
जर फलंदाजीच्या क्रमवारीबद्दल बोलायचे तर या टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर ( Suryakumar Yadav ranked 4th in T20 rankings ) आहे. तर कर्णधार रोहित शर्मा 14 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच कोहली आता फक्त रोहितच्या मागे आहे. आशिया कपमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवणारा पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान अव्वल स्थानावर आहे.
भुवनेश्वर कुमारला 4 स्थानांचा फायदा -
कोहलीशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही फायदा झाला ( Bhuvneshwar Kumar gain 4 places ) आहे. भुवीने आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 5 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय अन्य काही सामन्यांमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे भुवीला 4 स्थानांचा फायदा झाला. त्याने सातव्या क्रमांकावर कब्जा केला आहे.
श्रीलंकेचा हिरो हसरंगाला दुहेरी फायदा -
त्याचबरोबर श्रीलंकेला आशिया चषक विजेतेपद मिळवून देणारा फिरकी अष्टपैलू वानिंदू हसरंगा यालाही क्रमवारीत फायदा झाला ( Double advantage for Wanindu Hasaranga ) आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याने तीन स्थानांनी झेप घेत सहाव्या स्थान पटकावले आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हसरंगाने 7 स्थानांची झेप घेत चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे.
आशिया कप फायनलमध्ये हसरंगाने तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले. हसरंगाने संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत एकूण 9 विकेट घेतल्या. या जोरावर श्रीलंकेने सहाव्यांदा विजेतेपद पटकावले