ETV Bharat / bharat

West Bengal Violence : 'आम्हाला संवेदनशील बूथचे तपशील दिले नाहीत', हिंसाचारानंतर बीएसएफचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

शनिवारी पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. आता या हिंसाचारावरून बीएसएफच्या डीआयजींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने आम्हाला संवेदनशील बूथची माहिती दिली नाही, असे ते म्हणाले.

West Bengal Violence
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान हिंसाचार
author img

By

Published : Jul 9, 2023, 7:36 PM IST

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे डीआयजी एसएस गुलेरिया रविवारी म्हणाले की, पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीदरम्यान सुरक्षा एजन्सीला संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती देण्यात आली नव्हती. ते म्हणाले की, संवेदनशील मतदान केंद्रांबाबत बीएसएफकडून वारंवार विनंती करूनही पश्चिम बंगाल राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय सुरक्षा दलांना अशा बूथची कोणतीही माहिती दिली नाही.

'संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती दिली नाही' : डीआयजी एसएस गुलेरिया म्हणाले की, बीएसएफने संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला अनेक पत्रे लिहिली होती. परंतु त्यांना 7 जून रोजी दिलेली माहिती वगळता अन्य कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तेव्हा त्यांना फक्त अशा बूथच्या संख्येबद्दल सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या स्थानाबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही.

'सशस्त्र दलांचा पुरेसा वापर झाला नाही' : डीआयजी म्हणाले की, बीएसएफची तैनाती स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार केली जाते. 'केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आणि राज्य सशस्त्र पोलिसांच्या 59,000 जवान निवडणूक कर्तव्यासाठी दाखल झाल्या होत्या. परंतु संवेदनशील मतदान केंद्रांवर त्यांचा पुरेसा वापर झाला नाही,' असे ते म्हणाले. बीएसएफचे डीआयजी पुढे म्हणाले की, राज्यात 4834 बूथ संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. तेथे फक्त CAPF तैनात करण्यात आले होते. प्रत्यक्षात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.

पंचायत निवडणुकीदरम्यान राज्यभरात हिंसाचार : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 18 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मुर्शिदाबाद, कूचबिहार, मालदा, दक्षिण 24 परगणा, उत्तर दिनाजपूर आणि नादिया यांसारख्या अनेक जिल्ह्यांमधून बूथ कॅप्चरिंग, मतपेट्यांचं नुकसान आणि पीठासीन अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याची बातमी मिळाली आहे. डीआयजी म्हणाले की, निवडणुका सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि इतर राज्य पोलीस दलांच्या 59,000 जवानांना राज्यभरातील मतदान केंद्रांवर सुरक्षा देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये 4834 संवेदनशील बूथचाही समावेश आहे, जेथे फक्त CAPF तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा :

  1. West Bengal Panchayat Elections: पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांमध्ये प्रचंड हिंसाचार, विविध घटनांत 18 ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.