नवी दिल्ली : आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचण्यांमधून 6 विरोधक कुस्तीपटूंना सूट दिल्याने लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांनी IOA तदर्थ समितीवर टीका केली. योगेश्वर दत्त यांनी IOA तदर्थ समितीवर टीका करणे, विनेश फोगटला रुचले नाही. योगेश्वरच्या या टीकेला विनेश फोगटने उत्तर देत फटकारले. योगेश्वर हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंगचा चमचे, असल्याची सणसणीत टीका विनेशने केली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) तदर्थ समितीने 16 जून रोजी विनेश फोगट, बजरंग पुनिया, त्यांची पत्नी संगीता फोगट, साक्षी मलिक, त्यांचे पती सत्यव्रत कादियन आणि जितेंद्र किन्हा यांना त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये पात्रता मिळवावी लागेल, असे सांगितले होते. समितीने 6 कुस्तीपटूंना हेही सांगितले होते की, त्यांच्या विनंतीनुसार ऑगस्टमध्ये त्यांच्या एकहाती चाचण्या घेतल्या जातील.
योगेश्वर दत्तचा प्रश्न : यावरुन योगेश्वर दत्त यांनी प्रश्न उपस्थित केले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते योगेश्वर म्हणाले की, भूपेंद्रसिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेऊन देशातील कनिष्ठ कुस्तीपटूंवर अन्याय केला आहे. योगेश्वर दत्त यांनी ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, 'तदर्थ पॅनेलने खटल्याचा निर्णय घेताना कोणते निकष पाळले आहेत हे मला समजत नाही. तेही सर्व 6 पैलवानांसाठी. जर पॅनेलला चाचणीसाठी सूट द्यायची असेल तर इतर अनेक पात्र उमेदवारही आहेत, असे योगेश्वर दत्त म्हणाले. रवी दहिया हा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता देखील आहे. दीपक पुनिया कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्णपदक विजेता आहे. अंशू मलिक वर्ल्ड चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता आहे. सोनम मलिकनेही अनेक मोठे यश संपादन केले आहे. यांना सूट दिली पाहिजे होते. असेही दत्ते म्हणाले. पण 'मला समजत नाही की या 6 पैलवानांना सूट का देण्यात आली, प्रश्न योगेश्वर दत्त यांनी केला होता.
विनेश फोगट संतापली : योगेश्वर दत्त यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विनेश फोगटने उत्तर देत दत्त यांना फटकारले. योगेश्वरवर निशाणा साधत विनेशने ट्विटरवर लिहिले की, 'कुस्ती जगात तूम्ही बृजभूषणचे पाय चाटले हे नेहमी लक्षात ठेवले जाईल राहील. महिला कुस्तीपटूंना तोडण्यावर एवढा जोर लावू नका. त्यांचा निश्चय पक्का आहे आणि खूप मजबूत आहे. जास्त शक्ती लावून नका नाहीतर तुमचा मणका मोडेल. काळजी घ्या. तुम्ही तुमचा मान आधीच बृजभूषणच्या पायाखाली ठेवला आहे. तुम्ही खूप असंवेदनशील व्यक्ती आहात. तुम्ही अत्याचार करणाऱ्यांच्या बाजूने उभे आहात. तुम्ही त्यांची खुशामत करत आहात.
जयचंदशी तुलना : योगेश्वर दत्त हे ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात झालेल्या आरोपांचा तपास करणाऱ्या समितीमधील सदस्य होते. डब्ल्यूएफआय अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्या आरोपाची सत्यता तपासण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने तयार केलेल्या 6 सदस्याच्या समितीचा योगेश्वर एक एक भाग होते. विनेशने योगेश्वर यांची तुलना जयचंदशी केली आहे. जयचंद म्हणजे कनौजचा राजा. याने पृथ्वीराज चौहानचा पराभव करण्यासाठी मोहम्मद घोरीसोबत हात मिळवत कट रचला होता. यामुळे त्याला इतिहासात त्याच्या विश्वासघातकी प्रवृत्तीसाठी आठवले जाते. दरम्यान आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अनेकवेळा पदक जिंकणाऱ्या विनेश म्हणाली, 'जोपर्यंत योगेश्वरसारखे जयचंद कुस्तीत राहतील, तोपर्यंत निश्चितपणे अत्याचार करणार्यांचे मनोबल उंचावेल'.
विनेशने केले आरोप : याचबरोबर विनेशने योगेश्वर दत्त यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 'जेव्हा मी योगेश्वर दत्तचा व्हिडिओ ऐकला तेव्हा त्याचे ते विकृत हसणं माझ्या मनात बसले आहे. महिला कुस्तीपटूंसाठी बनवलेल्या दोन्ही समित्यांचा ते एक सदस्य होते. जेव्हा महिला कुस्तीपटू समितीसमोर त्यांच्या अग्नीपरीक्षा सांगत असत तेव्हा तो खूप विकृतपणे हसायचा. समितीच्या कार्यालयाबाहेर दोन महिला कुस्तीपटू पाणी प्यायला गेल्या, तेव्हा योगेश्वर दत्त बाहेर आले आणि बृजभूषणला काही होणार नाही. जा आणि सराव असे सांगितल्याचे विनेशने म्हटले. योगेश्वरने महिला कुस्तीपटूंना तडजोड करून ब्रिजभूषण यांच्यावरील आरोप मागे घेण्यास सांगितले, असाही आरोप विनेशने केला. योगेश्वरने दुसऱ्या महिला कुस्तीपटूला अतिशय अश्लील रीतीने सांगितले की, हे सर्व चालत असते. याला इतका मोठा मुद्दा बनवू नका. काही हवे असल्यास सांगा, असेही विनेशने म्हणाली. 'समितीच्या बैठकीनंतर योगेश्वरने महिला कुस्तीपटूंची नावे ब्रृजभूषण आणि मीडियासमोर उघड केली. दत्त यांनी अनेक महिला कुस्तीपटूंच्या घरीही फोन करून त्यांना त्यांच्या मुलीला समजून सांगण्यास सांगितले. योगेश्वर हे महिला कुस्तीपटूंच्या विरोधात जाहीरपणे वक्तव्ये करत होते. तरीही त्यांना दोन्ही समित्यांमध्ये ठेवण्यात आल्याचे विनेश म्हणाली.
हेही वाचा -