ETV Bharat / bharat

कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ; 'झेड' सुरक्षा अन् 'बुलेटप्रूफ' गाडी

पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

कैलाश विजयवर्गीय
कैलाश विजयवर्गीय
author img

By

Published : Dec 14, 2020, 4:54 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांना आता झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून, त्यांच्याकडे बुलेटप्रुफ गाडी देखील असणार आहे. या अगोदर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती.

जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी अज्ञाताविरोधात दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. हा हल्ला तृणमूल काँग्रेसने घडवून आणल्याचेही भाजपने म्हटले. केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगालमध्ये कार्यरत असलेल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना माघारी केंद्रात बोलावले आहे. केंद्राने या तीन अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात बोलावून घेतले आहे.

काय असते झेड सुरक्षा -

देशात काही महत्त्वाच्या किंवा अति महत्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून पोलीस किंवा स्थानिक प्रशासनातर्फे सुरक्षा प्रदान केली जाते. आपल्याकडे चार प्रकारची सुरक्षा दिली जाते. Z+, Z, Y आणि X हे उच्चतेनुसार उतरत्या क्रमवारीने ‘सिक्युरिटी लेव्हल्स’ आहेत. झेड सुरक्षा ही दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी असून या सुरक्षेमध्ये 22 कर्मचारी असतात. त्यात 4 ते 5 एनएसजी कमांडो आणि बाकी पोलीस दलातील व्यक्ती असतात. झेड सिक्युरिटी दिल्ली पोलीस अथवा CRPF द्वारे पुरवली जाते. यात एक संरक्षक कारचा देखील समावेश असतो. ही सुरक्षा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये योगा गुरू रामदेव आणि सिने अभिनेता आमिर खान अशा व्यक्ती सामील आहेत.

हेही वाचा - तेलंगणामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन महिलांना अटक; १८ किलो गांजा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.