3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले आणि दोन्ही देशांचे सैन्य 13 दिवस लढले. 16 डिसेंबर 1971 रोजी हे युद्ध अधिकृतपणे संपले (16 December 1971 India defeated Pakistan in war) आणि पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली. हा विजय (Vijay Divas) भारताच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयांपैकी एक होता. भारताच्या विजयाने बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती (creation of independent nation of Bangladesh) झाली.
पूर्व पाकिस्तानात निषेधाचे आवाज उठले : खरे तर 1947 च्या फाळणीनंतर भूमीचे दोन भाग पाकिस्तानच्या भागात आले. एक भारताच्या पश्चिमेकडून आणि एक भारताच्या पूर्वेकडून. त्या काळात बंगालला लागून असलेल्या पूर्वेकडील भागाला पूर्व पाकिस्तान म्हणत. पूर्व पाकिस्तानमध्ये सुमारे 75 दशलक्ष बंगाली भाषिक हिंदू आणि मुस्लिम राहत होते. बंगाली मुस्लिम वेगळे दिसत होते आणि त्यांची राजकीय विचारधाराही वेगळी होती. बंगाली मुस्लिमांची विचारधारा उदारमतवादी होती, म्हणजेच ते उदारमतवादी विचार करत असत. पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये केवळ 1600 किलोमीटरचे जमिनीचे अंतर नव्हते, तर दोन्ही भागांची विचारसरणी, खाण्यापिण्याच्या सवयी आणि बोलीभाषा भिन्न होत्या.
सांस्कृतीक वाद पेटला : पश्चिम पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बंगाली भाषा, बंगाली संस्कृती नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि हा अन्याय पूर्व पाकिस्तानच्या छातीत पेटलेल्या आगीत इंधन म्हणून काम करत होता. पूर्व बांगलादेशात वेगळे राष्ट्र होण्यासाठी आवाज उठू लागला. 1951 मध्ये जेव्हा पाकिस्तानने उर्दूला देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले. तेव्हा, पूर्वेकडे निषेधाचा आवाज झाला. लोकांनी बांगला ही दुसरी भाषा म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही.
1970 च्या ऐतिहासिक निवडणुका : पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात १९४७ पासून तणाव सुरू होता. 1970 च्या निवडणुकांनी जगाला दाखवून दिले की, पूर्व पाकिस्तानातील लोकांना नेमके काय हवे आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतरची ही पहिली सार्वत्रिक लोकशाही निवडणूक होती. शेख मुजीबुर रहमान यांच्या अवामी लीगने ऐतिहासिक विजय मिळवला पण, पश्चिम पाकिस्तानने त्यांना सरकार स्थापन करू दिले नाही. पश्चिम पाकिस्तानचे पंतप्रधान याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तानात मार्शल लॉ लागू केला.
लाखो महिलांवरील बलात्कार आणि हत्या : 1971 च्या युद्धाच्या काही महिन्यांपूर्वी पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानचे रस्ते महीलांच्या आवाजाने आणि रक्ताने रंगवले होते. पाकिस्तानी सैन्याने जे केले त्याची तुलना हिटलरच्या होलोकॉस्टशी केली जाते. मार्च 1971 मध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमधून देशभक्ती, भाषाभक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन सर्चलाइट सुरू झाले आणि बंगाली राष्ट्रवादीच्या क्रूर हत्या सुरू झाल्या. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी महिला आणि पुरुष दोघांनीही लढा दिला हे उल्लेखनिय आहे. महाविद्यालयीन मुलं-मुली, सामान्य माणसं सगळे स्वातंत्र्यासाठी लढत होते. बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान भारताने बांगलादेशला रेशन आणि सैन्य पाठवून मदत केली. युद्धादरम्यानच हजारो बांगलादेशींनी भारतात आश्रय घेतला.
राजकीय भूगोल बदलला : 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने आपला निम्मा भूभाग, त्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग आणि दक्षिण आशियातील भूराजकीय भूमिका गमावली. इंदिरा गांधी, मानेक शॉ आणि जनरल जगजित सिंग अरोरा हे महान नायक ज्यांनी जगाचा इतिहास आणि राजकीय भूगोल बदलून टाकला, ते आज कदाचित उपस्थित नसतील, पण जेव्हा जेव्हा नवीन राष्ट्र बांगलादेश आपला स्थापना दिवस साजरा करेल तेव्हा, या महान नायकांची नक्कीच आठवण होईल.
93 हजार पाक सैनिकांनी आत्मसमर्पण केले : 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या युद्धात या दिवशी पूर्व पाकिस्तानातील पाक लष्कराचे कमांडर ले. जनरल ए.ए.के. नियाझी यांच्यासह सुमारे 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. नऊ महिन्यांच्या रक्तरंजित संघर्षानंतर बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने यात निर्णायक भूमिका बजावली.
1973 ला ठराव मंजूर : भारताने ताबडतोब नवीन आणि स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली, परंतु बांगलादेशला स्वतंत्र आणि सार्वभौम देश म्हणून स्वीकारण्यासाठी पाकिस्तानला दोन वर्षे लागली. 1971 च्या युद्धानंतर सुमारे दोन वर्षांनी 1973 मध्येच पाकिस्तानच्या संसदेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.
या दिवशी पाकिस्तानचे खूप नुकसान झाले : जर पाकिस्तान धर्माच्या आधारावर भारतापासून वेगळा झाला, तर त्यांच्या नेत्यांनी एवढ्या मोठ्या पराभवाची आणि अशा पेचाची कल्पनाही केली नसती. पूर्व पाकिस्तानातील पराभवाने पाकिस्तानी लष्कराच्या प्रतिष्ठेला तडा गेला होता. पाकिस्तानने आपले अर्धे नौदल, एक चतुर्थांश हवाई दल आणि एक तृतीयांश सैन्य गमावले.
भारतीय विमानाच्या अपहरणामुळे युद्ध : बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाचा 30 जानेवारी 1971 रोजी 'गंगा' नावाच्या एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण आणि त्यानंतर काश्मिरी फुटीरतावाद्यांनी गंगा जाळण्याशी देखील जोडलेला आहे. अपहरणाच्या या घटनेने इंदिरा गांधींना हादरवून सोडले होते, असे मानले जाते. त्यानंतर भारताने भारताच्या आकाशातून पाकिस्तानी विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली होती, त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींवर मोठा परिणाम झाला होता.
भारताचे पूर्व पाकिस्तानशी संबंध : असे मानले जाते की, मार्च 1971 च्या अखेरीस भारत सरकारने मुक्ती वाहिनीला मदत करण्याचा निर्णय घेतला. मुक्ती वाहिनी हे खरे तर पूर्व पाकिस्तानचे सैन्य होते. ज्याने बांगलादेशला पाकिस्तानपासून मुक्त केले. मुक्ती वाहिनीमध्ये पूर्व पाकिस्तानातील सैनिक आणि हजारो नागरिकांचा समावेश होता. 31 मार्च 1971 रोजी इंदिरा गांधींनी भारतीय संसदेत भाषण देताना पूर्व बंगालमधील लोकांना मदत करण्याचे सांगितले. 29 जुलै 1971 रोजी भारतीय संसदेत पूर्व बंगालच्या मुलांना मदत करण्याची जाहीर घोषणा करण्यात आली. भारतीय लष्कराने आपल्या बाजूने तयारी सुरू केली. या तयारीमध्ये मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्याचाही समावेश होता. भारतीय निमलष्करी दलाचे सैनिकही साध्या गणवेशात मुक्ती वाहिनीमध्ये सामील झाले.
३ डिसेंबर रोजी युद्धाची घोषणा : जेव्हा पूर्व पाकिस्तानचे संकट स्फोटक टप्प्यावर पोहोचले. तेव्हा पश्चिम पाकिस्तानमध्ये भारताविरुद्ध लष्करी कारवाईची मागणी करणारे मोर्चे निघाले. दुसरीकडे भारतीय सैनिक पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर पहारा देत होते. 23 नोव्हेंबर 1971 रोजी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांनी पाकिस्तानी लोकांना युद्धाची तयारी करण्यास सांगितले.
भारताचा विजय : ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतावर हल्ला केला. अमृतसर आणि आग्रासह अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करण्यात आले. यातून 1971 चे भारत-पाक युद्ध सुरू झाले. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी लष्कराच्या आत्मसमर्पणाने आणि बांगलादेशच्या जन्माने युद्ध संपले. या युद्धात पाकिस्तानच्या सुमारे 93,000 सैनिकांनी भारतासमोर शस्त्रे टाकली होती. भारताच्या विजयाने बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली. या ऐतिहासिक विजयासोबतच भारताच्या लष्करी शक्ती - भारतीय घोडदल, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदल यांची जगभरात ओळख झाली.