ETV Bharat / bharat

Video Audio Calling Facility On X : एक्स सोशल मीडियावर येणार 'या' नव्या सुुविधा, एलॉन मस्कची घोषणा

Video Audio Calling Facility On X मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर नवीन फिचर येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 'X' चे संचालक एलॉन मस्क यांनी नुकतंच याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं की, लवकरच 'X' वर व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी युजरला कोणत्याही फोन नंबरची आवश्यकता लागणार नसल्याचं एलॉन मस्क यांनी स्पष्ट केलंय. (Video Audio Calling Facility On X)

Elon Musk
एलॉन मस्क
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 7:10 PM IST

नवी दिल्ली Video Audio Calling Facility On X : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर नवीन व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंगची सुविधा युजरसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत 'X' चे संचालक एलॉन मस्क यांनी नुकतीच याबाबत घोषणा केलीय. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिलंय की, लवकरच 'X' वर व्हिडिओसह ऑडिओ कॉलिंगची सुविधा युजरसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मस्क यांनी पुढं लिहिलंय की, हे फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना कोणत्याही फोन नंबरची आवश्यकता नसणार नाही. (Micro blogging platform X) (Elon Musk )

'X'वर व्हॉईससह व्हिडिओ कॉलची सुविधा : X चे नवीन संचालक, एलॉन मस्क, त्याच्या ॲपला सुपर ॲपमध्ये बदलण्याची योजना आखत आहेत. त्या दिशेनं त्यांनी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी सांगितलं की, आता 'X' मध्ये व्हॉईससह व्हिडिओ कॉल फीचर युजरला वापरता येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच हे फीचर आयओएस, अँड्रॉइड, मॅकसह पीसीवर काम करणार आहे. त्यासाठी कोणत्याही मोबाइल नंबरची गरज लागणार नाही, असं मस्क त्यांनी म्हटलं आहे. युजर आता WhatsApp, Instagram, Facebook 'X' सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ, ऑडिओ कॉल करू शकता. खुद्द एलॉन मस्क यांनी याबाबत माहिती दिली आहे. (iOS Android Mac)

फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामला टक्कर : कॉलिंग फीचर आणून एलॉन मस्कचा मेटाला टक्कर देणार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण हे फीचर फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर उपलब्ध होतं. मात्र आता 'X' वर देखील या फीचरची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. एलॉन मस्क यांनी पहिल्यांदा मे महिन्यात याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी त्यावेळी ट्विट केलं होतं की, 'लवकरच आम्ही व्हिडिओसह ऑडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला 'X' वरून जगात कुठेही कॉल करता येणार आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे हे फीचर वापण्यासाठी कोणत्याही फोन नंबरचीही गरज नसणार आहे.

हेही वाचा -

  1. OCCRP Report On Adani : अदानी समूह पुन्हा अडचणीत? विदेशी कंपनीच्या माध्यमातून व्यवहाराचा ओसीसीआरपीचा अहवाल
  2. Jio Air Fiber on Ganesh Chaturthi : 'जिओ एअर फायबर'चं गणेश चतुर्थीला लाँचिंग - मुकेश अंबानींची घोषणा
  3. Rules Change From 1st Sept 2023 : 1 सप्टेंबरपासून पगारवाढ, नविन नियम लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.