कोलकाता- प्रख्यात बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचे रविवारी पहाटे कोलकाता येथील चेतला भागातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ( Nirmala Mishra passed away) निधन झाले. ही माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. बालकृष्ण दास पुरस्कार प्राप्त मिश्रा (८१) या दीर्घकाळापासून वयोमानाने होणाऱ्या रोगांमुळे ( Renowned Bengali singer Nirmala Mishra ) आजारी होत्या.
गायिका निर्मला मिश्रा यांना शनिवारी सकाळी 12.05 च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना जवळच्या नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. मिश्रा या पश्विम बंगालमधील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय पार्श्वगायिका ( playback singer death ) होत्या. त्यांनी ओडिया आणि बंगाली चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आहेत.
ही गाणी होती लोकप्रिय‘-इमोन एकता झिनक’, ‘बोलो ते अर्शी’, ‘कागोजेर फुल बोले’ ( Kagojer phul bole) , ‘एई बांगलार माती चाय’ आणि ‘आमी ते तोमर’ ही काही लोकप्रिय बंगाली गाणी आहेत. आमी हरिये फेलेची गणेर साथिरे’ ही तिने गायलेली काही चित्रपटगीते आहेत.
केकेच्या निधनानेही चाहत्यांना बसला होता धक्का-11 भाषांमध्ये गाणी गाणारा प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नाथ उर्फ केके याचेही यावर्षी निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी आणि देशवासीयांना धक्का बसला आहे. केकेच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही की त्यांचा आवडता गायक आता या जगात नाही. केके यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक किशोर कुमार यांना आपले प्रेरणास्थान मानले. गाण्याच्या कारकिर्दीपूर्वी केके यांनी सेल्समनची नोकरीही केली होती. केकेने बॉलीवूडमधील आपले पहिले गाणे 'तडप-तडप के इस दिल से' गायले, जे आजही सुपरहिट आहे.
हेही वाचा-Hand Grenade Found In School Sangli : शाळेत मुलांना सापडला हॅन्ड ग्रॅनेड बॉम्ब; सर्वत्र उडाली खळबळ