नवी दिल्ली : काळ बदलला पण लव्ह मॅरेज ( love marriage ) करायचं तर अजूनही आपल्याकडे तरूण तरूणींना मोठी कसरत करावी लागते. घरच्यांची परवानगी घेताना किंवा त्यांना याविषयी सांगताना नाकी नऊ येतात. कुटूंबातील सदस्यांना याविषयी कसे सांगावे, कोणते उपाय आजमावेत कळत नाही. म्हणूनच आम्ही काही टिप्स घेऊन आलो ( Tips For Lovers ) आहोत.
घरगुती कार्यक्रमात पार्टनरला बोलवा : एखाद्या घरगुती कार्यक्रमात तुमच्या पार्टनरला बोलवा आणि त्यावेळी पालकांची आणि त्यांची ओळख करून द्या. किंवा मग हाॅटेल किंवा एखाद्या मॉलमध्ये ही भेट ( Tips For girlfriend ) घडवून आणा. त्यांची ओळख होऊ द्या. पण यावेळी पालकांना तुमच्या पार्टनरचे वागणे आवडेल, याची पुर्ण काळजी घ्या. नाहीतर सगळेच बिघडून जायचे. मग हळूहळू त्यांच्याविषयी घरात बोलणे सुरु करा आणि नंतर प्रसंग पाहून पालकांना प्रेमाबद्दल सांगा. आधी ओळख झालेली असल्याने पालकांना ते स्विकारणे सोपे जाऊ शकते.
अजिबात उतावळेपणा करू नका : प्रेमाची गोष्ट घरच्यांना सांगताना अजिबात उतावळेपणा करू नका. खूप हळूहळू संयमाने या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत. त्यामुळे या विषयासाठी योग्य वातावरण निर्मिती होण्याची वाट ( Tips For boyfriend ) बघा. एखादा सण- समारंभ असताना, सगळे आनंदात असताना किंवा मग तुम्ही काही तरी चांगलं केलंय आणि त्याबाबत तुमचं कौतूक होत आहे, असा एखादा प्रसंग गाठा आणि घरच्यांना सगळं सांगून टाका.
नातेवाईकांची मदत घ्या : आपले एखादे भावंड किंवा मग आपले जवळचे आत्या, मामा, मावशी, काका असे काही नातलग आपल्या पालकांच्या अगदी जवळचे असतात. मुलं समोर असतील तर पालकांनी मुळीच करू नयेत ५ गोष्टी, मुलांच्या मनावर होतो वाईट परिणाम त्या लोकांचा आपल्या पालकांवर प्रभाव असतो. पालकांना थेट सांगायची भीती वाटत असेल तर अशा जवळच्या नातलगांची मदत घ्या, त्यांना विश्वासात घ्या. आणि ते समोर असताना पालकांना तुमच्या प्रेमाबाबत सांगा. पालकांना पटवण्यात अशा नातलगांची नक्कीच मदत होईल.