ETV Bharat / bharat

तेलुगु लेखक वरावरा राव यांना नानावटी रुग्णालयात हलवले

author img

By

Published : Nov 19, 2020, 2:01 PM IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तेलुगू लेखक वरावरा राव यांना नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिंदे व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर वरावरा राव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती.

तेलुगु लेखक वरावरा राव
तेलुगु लेखक वरावरा राव

मुंबई - शहरी नक्षलवाद प्रकरण, ज्येष्ठ विचारवंत आणि तेलुगु लेखक वरावरा राव यांन नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने वरवरा राव यांच्यावर नानावटी या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात यावेत, असे निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांना बुधवारी रात्री तळोजा कारागृहातून नानावटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात वरावरा राव यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. वरावरा राव यांना योग्य उपचाराची गरज असून त्यांना राज्य सरकारच्या खर्चाने 15 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करावे. तसेच, त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करावा. न्यायालयात वैद्यकीय अहवाल सादर केल्यानंतरच वरावरा राव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज द्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिंदे व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. वरावरा राव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 9 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

राव यांच्या कुटुंबीयांकडून याचिका दाखल -

वरावरा राव यांना 2018 मध्ये यूएपीएअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात पुढील उपचार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्याला विरोध करण्यात आला. कोरोना संक्रमण पाहता वरावरा यांचे वय 81 वर्ष असून, त्यांना इतर आजार असल्यामुळे उपचार करण्यासाठी जामीन देत नानावटी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचे आदेश द्यावेत, याबाबत राव यांच्या कुटुंबीयांकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

कोणत्या प्रकरणी राव अटकेत?

पुण्याच्या शनिवार वाड्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. एल्गार परिषदेनंतर कोरेगाव-भीमा याठिकाणी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेदरम्यान चिथावणीखोर भाषण करत हिंसा घडवून आणल्याचा आरोप वरावरा राव यांच्यासह इतर नऊ जणांवर लावण्यात आलेला आहे. परिषदेच्या आयोजनात सहभाग असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील काहींची जामीनावर सुटका झाली. मात्र, राव अद्यापही तुरुंगात आहेत.

कोरेगाव भीमा प्रकरण : वरावरा राव यांना नानावटीत दाखल करण्याचे निर्देश; जामिनावरील सुनावणी ढकलली पुढे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.