ETV Bharat / bharat

Valentine Day 2023 : पुनर्वसन केंद्रात दोघांनी एकमेकांना मनोमन पाहिले अन् सुरू झाली बिहारी सौरवजीत अन् मराठी करिश्माची अनोखी प्रेम कहाणी - प्रेम

बिहारी सौरवजीत हा मुंबईत पुनर्वसन केंद्रात कोर्स करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याची महाराष्ट्रातील करिश्माशी मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर या दोघांनी लग्न केले. मात्र दोघेही दिव्यांग असल्याने त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे या दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारुन लग्न केले. आता या दोघांना दोन मुले असून सुखाचा संसार आहे.

Valentine Day 2023
बिहारी सौरवजीत अन् मराठी करिश्मा
author img

By

Published : Feb 14, 2023, 9:16 PM IST

पटना : प्रेम हे आंधळे असते असे म्हटले जाते, त्यामुळे डोळस व्यक्ती प्रेमात आंधळे झाल्याच्या अनेक घटना आपण अनुभवतो. मात्र दोन दिव्यांगांनी प्रेम करुन सुखाचा संसार थाटून डोळसांपुढे आदर्श निर्माण केल्याचे उदाहरण विरळेच असावे. चला तर मग आम्ही तुम्हाला आज अशीच यशस्वी प्रेम कहाणीची माहिती देणार आहोत. मनाने या दोन प्रेमविरांनी एकमेकांना पसंद केले आणि संसार थाटला. मात्र या दोन प्रेमविरांनी फक्त दोन कुटूंबच नाही तर दोन राज्याची मने जोडण्याचे काम केले. बिहारी सौरवजीत आणि महाराष्ट्राची करिश्मा या दोघांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट, खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी . . . .

बिहारी सौरवजीत अन् मराठी करिश्माची अनोखी प्रेम कहाणी

दिसण्यापासून सुरू होते प्रेमकहाणी : तरुण तरुणींची प्रेम कहाणी एक दुसऱ्यांवर मोहीत होऊन सुरू होते. अर्थात दिसण्यापासून सुरू होते. मात्र काहीजणांची प्रेमकहाणी त्यांच्या गुणांपासूनही सुरू होते. पटण्याचा सौरवजीत आणि महाराष्ट्राची करिश्मा यांची प्रेमकहाणी असीच वेगळी आहे. त्यांनी एकमेकांना प्रेमाची अनुभूती कशी आली याचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.

Valentine Day 2023
बिहारी सौरवजीत अन् मराठी करिश्मा

बिहारच्या सौरवजीतला मराठी करिश्मासोबत झाले प्रेम : बिहार राज्यातील पटना शहरातील सौरवजीत हा 2009 मध्ये महाराष्ट्राच्या करिश्माला भेटला होता. त्यावेळी या दोघांची चांगली मैत्री झाली. त्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या अकरा वर्षापासून या दोघांनी आपले प्रेम टिकवून ठेवले. त्यामुळे या दोन्ही अंधांची अनोखी प्रेमकहाणी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या दोघांनी प्रेमविवाह केला, आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.

Valentine Day 2023
बिहारी सौरवजीत अन् मराठी करिश्मा

पुनर्वसन केंद्रात झाली होती दोघांची भेट : सौरवजीत हा २००९ मध्ये बिहारहून मुंबईला पुनर्वसन केंद्रात कोर्स करायला आला होता. त्याचवेळी महाराष्ट्रातील करिश्माची बॅचही सुरू झाली. पुनर्वसन केंद्रात या दोघांची अगोदर ओळख नव्हती. करिश्मा तिच्या मैत्रिणींसोबत माझ्या कॅम्पसला भेटायला आली, त्यावेळी मी तिला माझ्या मनात पाहिल्याचे सौरवजीतने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. करिश्माशी ओळख झाल्यानंतर माझ्या आयुष्यात अशी मुलगी यावी असे मनोमनी वाटल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

करिश्माला दिला होता मोबाईल भेट : पुनर्वसन केंद्रात सौरवजीत आणि करिश्मामध्ये अगोदर फक्त चर्चा होत होती. त्यानंतर जेव्हा कोर्स संपला तेव्हा करिश्मा माझ्याकडे आली आणि आता मी घरी जाणार असल्याचे तिने मला सांगितले. त्यामुळे मी तिला आता मला करमणार नसल्याचे सांगितले. त्यावर करिश्माचेही सारखेच उत्तर आले. त्यामुळे आम्ही एकमेकांमध्ये सारखेच गुंतल्याचे माझ्या लक्षात आल्याचे सौरवजीतने यावेळी सांगितले. त्यामुळे घरी गेल्यानंतर करिश्माकडे मोबाईल नसल्याने तिच्यासोबत बोलता येणार नसल्याची काळजी मला वाटत होती, असेही सौरवजीतने सांगितले. ती घरी गेली तर कसे होईल, याची भीती मलावाटत होती.म्हणून मी एक मोबाईल विकत घेऊन करिश्माला गिफ्ट केल्याचे सौरवजीतने सांगितले. आम्ही दोघे मोबाईलवरून बोलत राहत असल्याचेही तो म्हणाला.त्यानंतर आम्ही दोघांनी लग्न केल्याचेही त्याने सांगितले.

कुटूंब होते लग्नाच्या विरोधात : सौरवजीत आणि करिश्माच्या लग्नाच्या विरोधात त्यांचे कुटूंब होते. त्यामुळे दोघांचे लग्न होणार नसल्याची भीती सौरवजीतला होती. मात्र करिश्माच्या घरच्यांना जेव्हा याबाबत माहिती झाली, तेव्हा तो बिहारी मुलगा आहे. त्याची जात आपल्या जातीपेक्षा वेगळी आहे, याबाबत आपल्या समाजातील लोकांना माहिती झाल्यास आपली बदनामी होण्याची भीती करिश्माच्या आईने व्यक्त केली होती. मात्र तरीही दोघांनी घरच्यांचा विरोध झुगारत लग्न केले.

सौरवजीतसोबत बोलल्यावर मारायची आई : सौरवजीत हा बिहारी मुलाग होता. त्यामुळे त्याच्यासोबत बोलताना पाहिल्यास आई मारत होती. मात्र मी लग्न करीन तर फक्त सौरवजीतसोबत असे मनोमन ठरवले होत, अशी माहिती करिश्माने ईटीव्ही भारतला दिली. त्यामुळे एक दिवस सौरवजीतचा फोन आला. तो मुंबईत येत असल्याचे त्याने सांगितले. मग मी अंगावरे होते, त्या कपड्यावर घरुन पळून मुंबईत आल्याची माहिती करिश्माने दिली. त्यानंतर आम्ही बांद्रा न्यायालयात लग्न केल्याचेही तिने सांगितले.

दोन मुलांचा फुलला संसार : अकरा वर्षापूर्वी सौरवजीत आणि करिश्माने बांद्रा न्यायालयात कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर या दोघांना दोन मुले झाली आहेत. त्यांचा दोघांचा संसारही चांगला सुरू आहे. दर व्हॅलेन्टाईन डेला ते दोघेही अनोख्या पद्धतीने साजरा करत असल्याची माहितीही करिश्माने दिली.

हेही वाचा - Mumbai Crime : व्हॅलेंटाईन डे गिफ्टच्या बहाण्याने फसवणूक; मुंबईतील महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान, काय आहे प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.