ETV Bharat / bharat

बोगद्यातील मजुरांच्या सुटकेकरिता काम करणारे कोण आहेत प्रोफेसर डिक्स, बचावपथकाच्या मोहिमेत आजपर्यंत काय घडलं?

Uttarkashi tunnel collapse सलग दहाव्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी आज आशेचा किरण दिसलाय. बचावपथकला पहिल्यांदाच मजुरांशी थेट व्हिडिओ कॅमेराद्वारे संवाद साधला आहे. त्यासाठी बोगद्यातून सहा इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली. यासाठी प्रोफेसर अर्लॉल्ड डिक्स यांनी मोलाची भूमिका बजाविली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 6:06 PM IST

Updated : Nov 21, 2023, 7:59 PM IST

Uttarkashi tunnel collapse
Uttarkashi tunnel collapse
बचावपथकाच्या कामात मोठं यश

देहराडून: आज पहाटे 3 वाजता सिल्क्यरा बोगद्यातून 6 इंची पाइपलाइन सोडण्यात यश आलं. अग्निशमन दलाच्या वाहनाने पाण्याच्या दाबानं पाईपलाईन साफ करून त्यात कॅमेरा सोडला. त्यामुळे 10 दिवसांत प्रथमच बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडिओ जगासमोर आला. मजुरांशी व्हिडिओद्वारे थेट संवाद झाल्यानं बचावपथकानं आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

  • #WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue operation | International Tunneling Expert, Arnold Dix says, "It's fantastic, of course, the news we have had over the last few hours. It is great to see the faces of those men that we are going to bring home. We have food going to… pic.twitter.com/t5f47dPgbu

    — ANI (@ANI) November 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बोगद्यातील मजुरांच्या सुटकेबाबत प्रोफेसर अरनॉल्ड डिक्स म्हणाले, बोगद्यात 6 इंची पाईपलाईन टाकण्यात आली असून ती पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी काम केले जात आहे. येथे अत्यंत धोकादायक वातावरण आहे. बोगद्यामध्ये एन्डोस्कोपी कॅमेरा घालण्यात बचावपथकाला यश आलं. कॅमेरात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये 41 मजुरांना बोगद्यात फिरण्यासाठी पुरेशी जागा असल्याचं आढळून आलं. बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी ६ इंची पाईपलाईनद्वारे अडकलेल्या मजुरांशी यशस्वीरित्या संवाद साधला आहे.

कोण आहेत प्रोफेसर डिक्स? प्रोफेस डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राऊंड स्पेस या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था बोगद्यामधील सुरक्षितता आणि आपत्कालीन संकटांवर मात करण्यासाठी काम करते. या क्षेत्रात डिक्स हे जगभरात प्रसिद्ध आहे. बोगद्यामधील तांत्रिक संशोधन आणि प्रत्येक प्रकल्पातील तांत्रिक बारकावे समजावून घेण्याची पद्धत ही उत्तराखंडमधील मजुरांच्या सुटकेसाठी उपयुक्त ठरत आहे.

सुटका करण्यासाठी रणनीती महत्त्वपूर्ण-मजुरांची सुटका करण्यासाठी डिक्स यांनी नियोजन आणि सुरक्षेचे महत्त्व सुरुवातीलाच अधोरेखित केले. सध्याच्या स्थिती मुल्यांकन करून पुढील धोके टाळण्याची त्यांनी गरज व्यक्त केली. बोगद्यामधील मजुरांच्या सुटकेसाठी डिक्स यांनी सर्व पद्धतीनं विश्लेषण करत सखोल नियोजन करणार असल्याचं जाहीर केलं. मजुरांची सुटका करण्यासाठी आठवडा उलटूनही आशेचा किरण नव्हता. मात्र, डिक्स यांचे आगमन होताच मजुरांच्या सुटकेबाबत ठोस कामाला सुरुवात झाली आहे. बोगद्यातील मजुरांची सुटका करण्यासाठी रणनीती महत्त्वपूर्ण ठरत आहे.

प्रोफेसर डिक्स यांना हे मिळाले आहेत पुरस्कार- प्रोफेसर डिक्स यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आजवर जगभरातील बोगद्याच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. 2011 मध्‍ये त्‍यांना बोगद्यांच्या सुरक्षेसाठी अॅलन नेलँड ऑस्‍ट्रॅलेशियन टनेलिंग सोसायटीनं पुरस्‍कार देण्यात आला. बोगद्यांमध्ये सुरक्षा वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात त्यांचे काम उल्लेखनीय आहे. 2022 मध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनद्वारे कमिटी सर्व्हिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बोगदा सुरक्षेसाठी नियम आणि मानके विकसित केल्यानं हा पुरस्कार देण्यात आला.

कशासाठी प्रसिद्ध आहेत प्रोफेसर डिक्स?प्रोफेसर अर्नॉल्ड डिक्स यांना जमिनीखाली बांधकाम आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जगप्रसिद्ध तज्ज्ञ मानले जाते. त्यामुळे उत्तराखंडमधील बोगद्यातील मजुराच्या सुटकेसाठी सरकारनं त्यांना पाचारण केलं. जमिनीखाली बोगदे, भूयारे आणि जमिनीखाली पायाभूत सुविधा निर्मिती करताना डिक्स यांच्याकडून करण्यात आलेल्या मार्गदर्शनाची मोठ्या प्रकल्पात दखल घेण्यात आली.

6 इंची पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित होणं महत्त्वाचं ठरलं- जमिनीखाली वाहतूक आणि बोगदा निर्मिती करण्याकरिता डिक्स यांचा मोठ्या प्रकल्पांमध्ये सल्ला घेतला जातो. घटनास्थळी आगमन होताच डिक्स यांनी सिलक्यारा बोगद्याचं परीक्षण केलं. तसेच मजुरांची सुटका करण्यासाठी काम करणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांशीही डिक्स यांनी चर्चा केली. मजुरांच्या सुटकेसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. 6 इंची पाईपलाईन पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी काम केले जात असल्याचं बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी सांगितलं.

आज दिवसभरात काय घडलं?

  • बचाव पथकानं पाइपलाइनद्वारे सोडण्यात आलेल्या कॅमेरासमोर येऊन सर्व मजुरांना बोलण्याची विनंती केली. त्यानंतर अडकलेले सर्व ४१ मजूर कॅमेऱ्याजवळ जमले. बचाव पथकाच्या सूचनेनंतर मजुरांनी कॅमेऱ्याची स्क्रीन साफ केली.
  • मजुरांना देण्यात आली खिचडी-बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ मजुरांसाठी आणि तेथील बचाव पथकांसाठी आज बटाटा आणि हरभऱ्याची खिचडी तयार करण्यात आली आहे. ही खिचडी बोगद्यातून मजुरांसाठी पाठविण्यात आली आहे. सिल्क्यरा बोगद्याच्या आवारात बोगदा बनवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वयंपाकघरात अन्न तयार करण्यात आलं. बोगद्यात अडकून 9 दिवस झाल्यानं मजुरांचे मनोबल वाढविण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी खिचडी दिली जात आहे. खिचडी ही पचायला हलकी, आरोग्यवर्धक आणि पौष्टिक मानली जाते.
  • बोगद्याभोवती संचारबंदी आणि वृत्तवाहिन्यांना सरकारचा सल्ला- सिल्क्यरा येथे सुरू असलेल्या बचाव कार्याला सनसनाटी बनवू नये, असा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वृत्तवाहिन्यांना सल्ला दिला आहे. बोगद्याच्या जवळून कोणताही व्हिडिओ घेऊ नये, असे प्रसारण मंत्रालयानं म्हटलं. बचावपथकाच्या कामात अडथळा येऊ नये व मजुरांचे मनोबल टिकण्यासाठी प्रसारण मंत्रालयानं हा सल्ला दिला. बोगद्याच्या आवारात जाऊन तिथल्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करणं शक्य झाले. यासोबतच मजुरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्यानं प्रशासनानं आता बोगद्याभोवती संचारबंदी लागू केली आहे.
  • मजुरानं आईला पाठविला भावनिक संदेश- सिल्क्यरा बोगद्यात मजूर अडकले असताना त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत एका मजुरानं पाईपलाईनद्वारे सोडलेल्या कॅमेरासमोर आईला भावनिक संदेश पाठविला. आई, मी ठीक आहे. प्लीज तू वेळेवर जेवत जा, असं पश्चिम बंगालमधील मजुरानं म्हटलं.

अमेरिकन मशिन सुरू झाल्यानं बचावकार्याला येणार मदत- अमेरिकन हेवी ऑगर मशीनने बोगद्याच्या आत ड्रिलिंग सुरू केले आहे. ही ड्रिलिंग मशीन खूप वेगाने काम करून एकाच वेळी मोठ्या भागातून कचरा काढून टाकते. सिल्क्यरा ते बारकोट या बोगद्याच्या बांधकामादरम्यान 12 नोव्हेंबर रोजी अचानक बोगदा कोसळल्यानं 41 मजूर अडकले आहेत. बोगद्याच्या या भागात वीज आणि पाण्याची सोय आहे. यापूर्वीच बचाव पथकानं मजुरांना पाणी, अन्न आणि ऑक्सिजन पुरवून त्यांची काळजी घेतली आहे.

हेही वाचा-

  1. सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाटत आहे अस्वस्थ, सलग आठव्या दिवशी बचाव मोहिम सुरू
  2. Uttarkashi Tunnel Collapsed: बोगद्यातं अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे 50 तासांपासून प्रयत्न सुरू, पाईपद्वारे अन्नाचा होतोय पुरवठा
  3. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा व्हिडिओ आला समोर; वॉकी टॉकीद्वारे साधला संपर्क

Last Updated : Nov 21, 2023, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.