देहरादून Uttarkashi Tunnel Accident Rescue : उत्तरकाशीतील सिलक्यारा इथल्या चारधाम रोड प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यानं अपघात झाला. या अपघातात बोगद्यात कामगार अडकले आहेत. या अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. मलबा पडल्यामुळे ड्रिलिंगचं काम मंद झालं आहे. त्यामुळे आता केंद्रीय यंत्रणांकडून हवाई दलाच्या मदतीनं हेवी ऑगर ड्रिलिंग मशीन आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे मदत आणि बचाव कार्याला गती मिळणार असल्याची अपेक्षा डीजीपी अशोक कुमार यांनी व्यक्त केली आहे. आम्ही सर्व कामगारांना सुखरूप वाचवू, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
-
Uttarakhand | Uttarkashi Tunnel accident: Relief and rescue work is going on in the Silkyara Tunnel. Due to natural obstacles, the speed of drilling is slow. Today efforts are being made by the central agencies with the help of the Air Force, to bring heavy auger drilling… pic.twitter.com/faszlBms02
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Uttarakhand | Uttarkashi Tunnel accident: Relief and rescue work is going on in the Silkyara Tunnel. Due to natural obstacles, the speed of drilling is slow. Today efforts are being made by the central agencies with the help of the Air Force, to bring heavy auger drilling… pic.twitter.com/faszlBms02
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 15, 2023Uttarakhand | Uttarkashi Tunnel accident: Relief and rescue work is going on in the Silkyara Tunnel. Due to natural obstacles, the speed of drilling is slow. Today efforts are being made by the central agencies with the help of the Air Force, to bring heavy auger drilling… pic.twitter.com/faszlBms02
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 15, 2023
बोगद्यात अडकले 40 मजूर : सिलक्यारा बोगद्यात भूस्खलनामुळे 40 मजूर अडकले आहेत. या मजुरांना वाचवण्यासाठी हेवी ऑगर मशीन आणण्यात येणार आहेत. त्यामुळे या मजुरांना वाचवण्याच्या पल्लवित झाल्या आहेत. हेवी ऑगर मशीनमध्ये पाईप पुशिंग टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे ही मशीन बोगद्यातील ढिगाऱ्यात ड्रिल करुन 880 ते 900 मिमी पाईप आत पाठवण्याची योजना आहे. त्यामुळे बोगद्यात अडकलेले मजूर त्या मार्गानं बाहेर येऊ शकतील, अशी प्रशासनाची योजना आहे.
सिल्क यारा बोगद्यात रविवारी सकाळी कोसळली दरड : सिलक्यारा बोगद्यात बांधकाम सुरू होते. मात्र रविवारी सकाळी बांधकाम सुरू असताना सिलक्यारा बोगद्यात दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर मलबा 60 मीटरच्या परिघात पसरल्याची माहिती प्रशासनानं दिली. त्यामुळे बोगद्यात काम करणारे कामगार आतच अडकले आहेत. सोमवार ते मंगळवारपर्यंत 25 मीटर परिसरातून मलबा हटवण्यात आला. मात्र दरड कोसळून पुन्हा मलबा पडत असल्यानं मदत आणि बचाव कार्य बाधित होत आहे.
कामगारांच्या सुटकेसाठी ऑगर मशिननं ड्रिलिंग : सिलक्यारा बोगद्यात सोमवारी ऑगर मशिननं ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी सहा वाजता ही मशिन बोगद्याजवळ पोहोचली आहे. सायंकाळी मशिन बसवण्यात आल्याची माहिती यावेळी प्रशासनाकडून देण्यात आली. ऑगर मशीन सांडपाण्याची पाइपलाइन बसवण्यासाठी वापरण्यात येते. बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी ही मशीन ड्रिल करत आहे. बोगद्यातून कामगारांना वाचवण्यासाठी ऑगर मशीन बसवण्यात आली आहे. त्यामुळे भंगारात हलके स्टीलचे पाइप टाकून मार्ग तयार केला जात आहे. त्यातून कामगार बाहेर पडतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Uttarkashi Tunnel Collapsed : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी झाला संपर्क; ऑक्सिजन पुरविण्याची केली मागणी
- Uttarkashi Tunnel Collapsed: बोगद्यातं अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्याचे 50 तासांपासून प्रयत्न सुरू, पाईपद्वारे अन्नाचा होतोय पुरवठा
- Video Jawans Rescue Dog जीव धोक्यात घालून अग्नीशमन दलाच्या जवानाने श्वानाचे वाचविले प्राण