डेहराडून - महिलांच्या फाटक्या जीन्स मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांना भाजप हायकमांडकडून चौकशीासठी दिल्लीत बोलाविण्यात आले आहे. या प्रकरणाबद्दल भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे रावत यांची चौकशी करणार आहेत.
भाजप हायकमांडकडून बोलावणे आल्यावर रावत हे दिल्लीसाठी रवाना झाले. १० मार्चला उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर ते प्रथमच दिल्लीला जाणार आहेत. रावत यांनी महिलांच्या कपड्याबाबत केलेल्या विधानामुळे ते वादात सापडले आहेत. तसेच याविरुध्द समाजातील सर्व स्तरातून नाराजीही व्यक्त केली जात आहे. रावत यांना त्या विधानाबाबत भाजप पक्षाध्यक्षांसमोर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. मुख्यमंत्री तीरथसिंग रावत हे दुपारी १२ वाजता दिल्लीसाठी निघाले आहेत. ते जेपी नड्डा यांना दुपारी १.३० वाजता भेटणार आहेत. आज ते दिल्लीत विश्रांती घेणार असून, शनिवारी उत्तराखंडला जाण्यासाठी निघणार आहेत.
हेही वाचा -
रश्मी त्यागी यांनी नवऱ्याची केली पाठराखण
तीरथसिंग रावत यांची पत्नी ऱश्मी त्यागी यांनी नवऱ्याची पाठराखण केली आहे. त्यांनी केलेल्या विधानाचा विरोधी पक्षाने चुकीच्या पध्दतीने घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऐतिहासिक वारसा, तसंच पारंपारिक लोककलांचे जतन करण्यासाठी तसेच स्त्रियांचा समाजातील सहभाग वाढवणे हेच त्यांचा म्हणायचे होते. असेही रश्मी त्यागी यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षाने त्यांच्या विधानाचा चुकीच्या पध्दतीने अर्थ घेतला आहे. आणि त्यांची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -