हैदराबाद - उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक येत आहेत. सुरुवातीला लालकुआं मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा पराभव झाला आहे. आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांचाही खटीमा विधानसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला आहे. मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असलेल्या धामी यांच्या पराभवामुळे आता भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे.
तरुण वर्गाची चांगली पकड - उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे राज्याचे 11वे मुख्यमंत्री आहेत. भगत सिंह कोश्यारी यांचे निकटवर्तीय असलेल्या धामी हे तरुणपणापासूनचनच भाजपमध्ये सक्रिय आहेत. 2002 ते 2008 पर्यंत ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. युवा मोर्चाचे नेतृत्व करताना त्यांनी राज्यात सर्वत्र फिरून प्रचार केला होता. बेरोजगार तरुणांना सोबत घेत एक भव्य रॅली काढत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर त्यांच्या पाठीशी असलेल्या युवाशक्तीचा विचार करत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती.
सैनिकी कुटुंबात झाला जन्म - पिथौरागड जिल्ह्यातील डीडीहाटच्या टुण्डी या गावातील एका सैनिकी कुटुंबात धामी यांचा जन्म झाल. त्यांनी शासकीय शाळेतच आपले शिक्षण पूर्ण केले. शैक्षणीक काळातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) च्या संपर्कात आले व 1990 ते 1999 पर्यंत परिषदचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम पाहिले.
त्यानंतर ते भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे सुरू ठेवले आपले कार्य - 2002 ते 2008 या काळात युवा मोर्चाची धुरा संभाळत असताना युवा रोजगाराच्या मुद्द्यावरून राज्यातील युवकांची मोठ बांधली. त्यावेळी उद्योगांमध्ये स्थानिक युवकांसाठी 70 टक्के आरक्षण मिळवून देण्याची घोषणा त्यांनी केली होती आणि मिळवून दिलेही, त्यामुळे युवा वर्गात त्यांची एक वेगळी छबी निर्माण झाले. 2012 च्या विधानसभा निवढणुकीत भाजपने त्यांना खटीमा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले. 2017 साली भाजपने पुन्हा त्यांची उमेदवारी दिली त्यावेळीही ते निवडणूक आले. काही काळानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, यंदा त्यांचा पराभव झाला आहे.