लखनऊ (उत्तर प्रदेश) - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. 13 जानेवारी) भारतीय किसान युनियचे प्रवक्ते राकेश टिकैत यांची मुजफ्फरनगर येथील टिकैत यांच्या निवासस्थानी भेट ( Sanjay Raut Meets Rakesh Tikait ) घेतली. ही भेट शेतकऱ्यांसाठीच्या धोरणांबाबत झाल्याची माहिती टिकैत यांनी दिली तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या ( Uttar Pradesh Assembly Election 2022 ) पार्श्वभूमीवर झाल्याचे संकेत राऊत यांनी दिले.
खासदार संजय राऊत हे आज दुपारी राकेश टिकैत यांच्या निवासस्थान भेटीसाठी पोहोचले. त्यानंतर बंद दाराआड राऊत व टिकैत यांच्यात चर्चात झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यांशी फोनवरुन टिकैत यांनी चर्चा केली. त्यानंतर दोघांना पत्रकारांशी बातचित केली. यावेळी राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार आहे. महाराष्ट्र सरकार राकेश टिकैत यांच्या अंदोलनाला पूर्वीपासून पाठींबा देत आहे. सत्ता कोणाची येणार याचा निर्णय शेतकरी करु शकतो. शेतकऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणीच सत्ता स्थापन करू शकत नाही. राऊत यांनी कालच (दि. 12 जानेवारी) जाहीर केले होते की, शिवसेना उत्तर प्रदेशात 50 ते 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आम्ही पश्चिमी उत्तर प्रदेशात लक्ष केंद्रीत केले असून त्यानुसार गुरुवारी (दि. 13 जानेवारी) दौरा करणार आहे.
ठाकरे यांच्या झालेल्या चर्चेबाबत बोलण्यास टाळाटाळ - यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे व राकेश टिकैत यांच्यामध्ये फोनवरुन काय चर्चा झाली याबाबत विचारणा केली असता राऊत यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.
हेही वाचा - UP Assembly Election 2022 : भाजपातील पडझड रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः मैदानात.. आज निवडणूक समितीची बैठक