ETV Bharat / bharat

Goa Election : पणजीत भाजपला उत्पल पर्रीकर यांचे आव्हान, फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला - भाजपा विरुद्ध उत्पल पर्रीकर

गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) चर्चेत आली ती भाजपच्या पणजी उमेदवारामुळे, पणजी मतदारसंघात भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Former Chief Minister Manohar Parrikar) यांच्या मुलाला उमेदवारी नाकारून स्थानिक आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट दिल्याने पणजीत भाजपा विरुद्ध उत्पल पर्रीकर (BJP v. Utpal Parrikar) आणि पर्यायाने मनोहर पर्रीकर असा संघर्ष सुरू आहे.

Utpal Parrikar
उत्पल पर्रीकर
author img

By

Published : Feb 9, 2022, 12:11 PM IST

Updated : Feb 9, 2022, 1:35 PM IST

पणजी: गोवा विधानसभा निवडणूक चर्चेत आली ती खऱ्या अर्थाने भाजपच्या पणजी उमेदवार निवडीमुळे, पणजी मतदारसंघात भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला उमेदवारी नाकारून स्थानिक आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट दिल्याने पणजीत भाजपा विरुद्ध उत्पल पर्रीकर आणि पर्यायाने मनोहर पर्रीकर असा संघर्ष सुरू आहे. भाजपने बाबुश मोंसरात यांना तिकीट जाहीर केल्यानंतर उत्पल यांनी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवीत आहे, त्यामुळे मोंसरात यांना उत्पल यांनी आव्हानं उभे केले आहे

भाजपला पर्रीकर यांचे आव्हान

शिवसेना व इतर पक्षांचा पाठिंबा
पणजी मतदारसंघात शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसने उत्पल पर्रीकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे, शिवसेनेने पणजी मतदारसंघातून शैलेंद्र वेलींगकर याना उमेदवारी दिली होती, मात्र ती त्यांनी मागे घेत उत्पल याना पाठिंबा जाहीर केला. याचा फायदा उत्पल यांना होईल.

काँग्रेस उमेदवार चा ही पाठिंबा
काँग्रेस ने ऐनवेळी उदय मदकाईकर यांचे तिकीट कापून एल्विस गोम्स याना उमेदवार म्हणून जाहीर केले त्यामुळे नाराज मदकाईकर यांनीही उत्तपल याना पाठिंबा जाहीर केला आहे.

फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला
फडणवीस यांनी बाबुश यांना तिकीट देण्यात महत्वाची भूमिका होती त्यामुळे मोंसरात यांना विजयी करण्यासाठी भाजपला आणि पर्यायाने फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि पर्रीकर समर्थक यांच्या पाठिंब्यावर उत्पल पर्रीकर काय किमया साधता त याकडे सगळ्या गोव्यसह भारताचे लक्ष लागून राहिले आहे.

Last Updated : Feb 9, 2022, 1:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.