रामेश्वरम US Want Chandrayaan 3 : चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यापूर्वी अंतराळ यानाची प्रगती पाहिल्यानंतर अमेरिकेतील जटिल रॉकेट मोहिमेचा विकास करणारे तज्ञ अवाक झाले होते. तसंच भारतानं अंतराळ तंत्रज्ञान सामायिक करावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केल्याचं इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलंय. आजघडीला भारत सर्वोत्तम उपकरणं आणि रॉकेट तयार करण्यास सक्षम आहे. त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केलंय, असं सोमनाथ यांनी इथं एका कार्यक्रमात सांगितलं. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सोमनाथ विद्यार्थ्यांना संबोधित करत होते, यावेळी त्यांनी हे सांगितलं.
इस्रोचे प्रमुख सोमनाथ काय म्हणाले : आपला देश खूप शक्तिशाली आहे. आमच्या बुद्धिमत्तेची पातळी जगातील सर्वोत्तम आहे. चंद्रयान-३ मध्ये जेव्हा आम्ही अंतराळ यानाची रचना आणि विकास करताना ‘जेट प्रोपल्शन’ प्रयोगशाळेतील नासा-जेपीएलच्या तज्ञांना आम्ही आमंत्रित केल्याच सोमनाथ म्हणाले. सुमारे ५-६ तज्ज्ञांनी इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली होती. तेव्हा चंद्रयान-३ बद्दल त्यांना माहिती दिली. त्याचं सॉफ्ट लँडिंग होण्यापूर्वी आम्ही केलेल्या तयारीबद्दल त्यांना सांगितलं. त्यावर ‘तुमची वैज्ञानिक उपकरणं खूप स्वस्त असून तुम्ही वापरलेलं तंत्रज्ञानही उच्चपातळीचं आणि उत्तम दर्जाचं आहे. तुम्ही ते कसं तयार केलं? तुम्ही हे अमेरिकेला का विकत नाही? असे त्यांनी आम्हाला विचारल्याचं सोमनाथ यांनी सांगितलं.
कोणाला चंद्रावर जायचंय का : यावेळी सोमनाथ यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की, अब्दूल कलाम म्हणाले होते की, रात्री नव्हे तर जागे असताना स्वप्न पहा. कोणाला अशी स्वप्नं पडतात का? कोणाला चंद्रावर जायचंय का? जेव्हा आम्ही चंद्रयान-३ चंद्रावर उतरवलं तेव्हा मी पंतप्रधान मोदींना सांगितलं की, भारत चंद्रावर आहे. त्यांनी विचारलं की तुम्ही भारतीयाला चंद्रावर कधी पाठवणार आहात. तर तुमच्यापैकी काही इथं बसून रॉकेट डिझाइन करतील आणि चंद्रावर जातील.
चंद्रयान-10 मोहिमेद्वारे एक मुलगी चंद्रावर जाणार : इस्रो प्रमुख सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-10 मोहिमे दरम्यान तुमच्यापैकी एक रॉकेटमध्ये बसेल आणि त्यात कदाचित एक मुलगी असेल. ही अंतराळवीर मुलगी चंद्रावर उतरणार आहे. चंद्रयान-३ मोहिमेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून भारतानं इतिहास रचलाय.
हेही वाचा :