कीव : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला हेलिकॉप्टर आणि लष्करी उपकरणांसह 800 दशलक्ष नवीन लष्करी मदत देण्याचे मंजूर केले आहे. युक्रेन रशिया करत असलेल्या हल्ल्यांपासून आपला अधिक मजबूतपणे बचाव करेल यासाठी ही मद पुरवली असल्याची माहिती समोर आली आहे. (Russia Ukraine War 50Th Day) दरम्यान, रशियाने म्हटले आहे की, दक्षिणेकडील मारियोपोल शहरात (1,000)हून अधिक युक्रेनियन सैनिकांनी आत्मसमर्पण केले आहे. त्याचवेळी, मिळालेल्या माहितीनुसार, रशियाकडून युक्रेनमध्ये रासायनिक अस्त्रांचा वापर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
युक्रेनला मजबूत करण्यासाठी अमेरिकेची मदत - रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनच्या 36 व्या मरीन ब्रिगेडच्या (1026) सैनिकांनी शहरात आत्मसमर्पण केले. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सेव्ह अरेस्टोव्हिच यांनी या सामूहिक आत्मसमर्पणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, त्यांनी ट्विटरवर सांगितले की 36 व्या मरीन ब्रिगेडचे सैनिक शहरातील इतर युक्रेनियन सैन्यांशी संपर्क साधण्यात सक्षम आहेत. इथे युक्रेनला मजबूत करण्यासाठी अमेरिका वेळोवेळी मदत करत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी मदत पुरवठ्याचे समन्वय साधण्यासाठी फोन कॉल केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या मदतीची घोषणा केली.
रशिया युक्रेनविरुद्ध रासायनिक शस्त्रे वापरू शकतो का - युद्धाच्या काळात रशिया युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रे वापरू शकतो अशी माहिती समोर येत आहे. अलीकडे प्रसिध्द झालेल्या काही अहवालानुसार काही विशिष्ट परिस्थितीत, रशियाद्वारे त्याचा वापर होण्याची शक्यता आहे. कारण पुतिन म्हणाले आहेत की एखाद्या मोठ्या आघाडीवरील गतिरोध तोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे. दरम्यान, संयुक्त राष्टांमधील व्हेटोच्या विशेषाधिकाराचा रशियाने गेल्या काही वर्षांत गैरवापर केला आहे, असा आरोप रशियाने केला आहे. असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच, यातील काही मुद्यांबाबत आमसभेत बैठक बोलावण्यात येईल. असही ते म्हणाले आहेत.
ज्यांनी पुतीनला सहकार्य केले त्यांना आम्ही लक्ष्य करू - ब्रिटीश सरकारने बुधवारी फुटीरतावाद्यांवर आणखी 178 निर्बंधांची घोषणा केली. गुरुवारी ब्रिटीश संसदेत एक कायदा सादर होण्यापूर्वी हे पाऊल उचलले गेले आहे. या कारवाईत लोह आणि पोलाद उत्पादनांच्या आयातीवर आणि लक्झरी वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येणार आहे. या निर्बंधांमध्ये रशियन तेल कंपन्यांच्या मालकांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस म्हणाले की ज्यांनी पुतीन यांच्या युद्धात सहकार्य केले त्यांना आम्ही लक्ष्य करत राहू...
हेही वाचा - Interview The VC Of JNU : विद्यापीठात हिंसाचाराला थारा नाही; पहा 'JNU'च्या कुलगुरूं मुलाखत