नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी नागरी सेवा 2022 चा अंतिम निकाल जाहीर केला. ज्यामध्ये इशिता किशोर अव्वल ठरली आहे. ग्रेटर नोएडातील जलवायू विहार येथे राहणारी इशिता या यशानंतर खूप आनंदी आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे. निकाल लागताच तिच्या घरी अभिनंदन करणाऱ्यांची गर्दी झाली आहे.
-
#WATCH मेरे परिवार ने मुझे असीम समर्थन दिया, भले ही मैंने प्रीलिम्स को दो बार पास नहीं किया लेकिन उन्हें मुझ पर बहुत विश्वास था। जिस तरह से उन्होंने मुझे आगे बढ़ाया और मेरे लिए चीजों को आसान बनाया, मैं उसके लिए उनकी आभारी रहूंगी: यूपीएससी 2022 में टॉप करने वाली इशिता किशोर,… pic.twitter.com/3N34xzRclp
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH मेरे परिवार ने मुझे असीम समर्थन दिया, भले ही मैंने प्रीलिम्स को दो बार पास नहीं किया लेकिन उन्हें मुझ पर बहुत विश्वास था। जिस तरह से उन्होंने मुझे आगे बढ़ाया और मेरे लिए चीजों को आसान बनाया, मैं उसके लिए उनकी आभारी रहूंगी: यूपीएससी 2022 में टॉप करने वाली इशिता किशोर,… pic.twitter.com/3N34xzRclp
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023#WATCH मेरे परिवार ने मुझे असीम समर्थन दिया, भले ही मैंने प्रीलिम्स को दो बार पास नहीं किया लेकिन उन्हें मुझ पर बहुत विश्वास था। जिस तरह से उन्होंने मुझे आगे बढ़ाया और मेरे लिए चीजों को आसान बनाया, मैं उसके लिए उनकी आभारी रहूंगी: यूपीएससी 2022 में टॉप करने वाली इशिता किशोर,… pic.twitter.com/3N34xzRclp
— ANI_HindiNews (@AHindinews) May 23, 2023
'टॉप करण्याचे कोणतेही सूत्र नाही' : ईटीव्ही भारतशी झालेल्या संभाषणात तिने सांगितले, की मी कठोर परिश्रम आणि दररोज सुमारे 8 तास अभ्यास केल्यानंतर या टप्प्यावर पोहोचली आहे. प्रथम क्रमांक मिळवण्याची इच्छा प्रत्येकाला असते. पालकांनी मला अभ्यासासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यानंतरच मी हे स्थान मिळवू शकले आहे. प्रत्येकजणच कठोर परिश्रम करतो आणि प्रत्येकालाच प्रथम स्थान मिळवायचे असते. मात्र यासाठी कोणतेही सूत्र नाही. दररोज तुम्हाला तुमच्या चुकांमधून धडा घ्यावा लागतो आणि ज्या काही उणिवा बाहेर येतील त्या सुधारायच्या असतात.
'कुटुंबाने कायम पाठिंबा दिला' : इशिता पुढे म्हणाली की, माझ्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला जाऊ शकत नाही. माझ्यासाठी माझे संपूर्ण कुटुंब गुरू असून त्यांच्या मेहनतीमुळेच मला देशात प्रथम क्रमांक मिळाला. माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला. जरी मी दोनदा प्रिलिम्स क्लियर केले नाही तरीही त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्यांनी ज्या प्रकारे मला पुढे केले आणि माझ्यासाठी गोष्टी सुलभ केल्या त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन.
इशिता आहे चांगली फुटबॉलपटू : इशिताचा भाऊ इशांत हर्ष याने सांगितले की, ती कॉर्पोरेटर अॅडव्होकेट आहे. 2004 मध्ये त्यांचे वडील विंग कमांडर संजय किशोर यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांच्या आईने मोठ्या कष्टाने संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ केला. त्याने सांगितले की, इशिता आधीच अभ्यासात खूप चांगली होती. त्यामुळे कुटुंबाने तिला पूर्ण सूट दिली आणि आज तिने कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव रोशन केले आहे. इशिताने तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण एअरफोर्स बालभारती स्कूलमधून केले. तसेच ती एक चांगली फुटबॉल खेळाडू देखील आहे.
दिल्ली विद्यापीठाची पदवीधर आहे : इशिता किशोरने 2017 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने अर्न्स्ट अँड यंगसोबत रिस्क अॅडव्हायझरीमध्ये काम केले. ती एक क्रीडापटूही राहिली आहे. तसेच तिची महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्येही गणना होते. इशिताने कठोर परिश्रमाने केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर कॉलेजलाही नाव मिळवून दिले आहे.
हेही वाचा :