चंदीगड - पंजाब सरकार अनेक मोठे निर्णय घेतल्यामुळे चर्चेत आले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab CM on VIP security ) यांनी 184 व्हीआयपी जणांच्या सुरक्षेत कपात ( Punjab government reduced the security ) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारने माजी मंत्री, आमदार आणि खासदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासह कुटुंबासह 184 जणांचा ( 184 VIP security in Punjab ) समावेश आहे.
नेत्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात - पंजाब सरकारच्या या निर्णयानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या कुटुंबाची ( Punjab Ex CM secuirty ) सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याशिवाय पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा ( VIP security issue in Punjab ) यांच्या मुलाचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या मुलाकडे सर्वाधिक सुरक्षा कर्मचारी होते. पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांचा मुलगा अर्जुन बादल, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग आणि माजी डीजीपी सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांचा मुलगा सिथांत चट्टोपाध्याय यांच्याकडीलही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
या नेत्यांची काढण्यात आली सुरक्षा- बीबी जागीर कौर, माजी मंत्री सुरजित सिंह राखरा, जनमेजा सिंग सेखॉन, तोता सिंग, गुलजार सिंग राणीके, जोगिंदर सिंग जिंदू, राजिंदर सिंग मेहता, अमरजित सिंग चावला, जगजीत सिंग तलवंडी, प्रकाश चंद गर्ग, प्रेम मित्तल सोहन सिंग थंडल, माजी खासदार संतोष चौधरी, माजी आमदार जोगिंदर पाल जैन, वीरेंद्र सिंग बाजवा. याशिवाय एसजीपीसी सदस्य सुरजित सिंग गद्री, माजी एसजीपीसी अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल, पटना साहिबचे माजी जथेदार ग्यानी इक्बाल सिंग यांची सुरक्षा काढण्यात आली आहे.
सुरक्षा हटविल्यावरून विरोधकांनी साधला निशाणा - व्हीआयपीची सुरक्षा करण्यावरून राजकारण पेटले आहेत. सुरक्षा परत करण्यावरून काँग्रेस आणि अकाली दलाने आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे. त्यांची सुरक्षा काढून घेण्यास विरोधक सांगतात पण मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आई आणि बहिणीला सुरक्षा का देण्यात आली? त्याचवेळी मान सरकारचे मंत्री पायलट जिप्सी आणि कमांडोची फौज घेऊन का फिरत आहेत, असा सवालही त्यांनी केला.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षांचा 'आप'ला घेराव- दुसरीकडे, 'आप' सरकारच्या मंत्र्यांना कमांडो आणि पायलट जिप्सी का देण्यात आले आहेत, असा सवाल युवक काँग्रेसचे अध्यक्ष वृंदर धिल्लन यांनी केला. त्याचवेळी ढिल्लोन यांनी विचारले की, एका महिन्यात त्याने असे काय केले? त्यामुळे धोका निर्माण झाला? विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आम आदमी पक्षाने उत्तर दिले आहे. आपचे प्रवक्ते नील गर्ग म्हणाले, की बंदूकधारी सुरक्षा जवान हे फक्त प्रतिष्ठेसाठी ठेवण्यात आले होते. हे जवान परत सार्वजनिक सुरक्षेसाठी सेवा बजाविणार आहेत. विरोधकांकडून आपचे मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या सुरक्षेवर प्रश्न- अकाली नेते विरसा सिंग वलटोहा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या बहिणीला आणि आईला सुरक्षा का देण्यात आली आहे, असा सवाल वलटोहा यांनी केला. मंत्र्यांसोबत 3 पायलट जिप्सी आणि 20 कमांडो का आहेत, असा सवालही त्यांनी केला. पत्नीला बंदूकधारी पोलीस का देण्यात आले, असा सवालही त्यांनी परिवहन मंत्र्यांना केला.
हेही वाचा-Lemon Theft Video : चोराने 50 किलो लिंबू भाजी मंडईमधून पळविले, पोलिसांत गुन्हा दाखल
हेही वाचा-Amit Shah on common civil code : देशभरात समान नागरी कायदा लागू होणार - अमित शाह यांची घोषणा