नवी दिल्ली - देशातील यूपीआयचे ( Unified Payment Interface ) सर्व्हर डाऊन ( UPI Server Down ) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेकांना गूगल पे ( Google Pay ), फोन पे ( PhonePe ) किंवा पेटीएम ( Paytm )द्वारे डिजिटल पेमेंट ( Digital Payment ) करताना ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागले. मात्र, आता यूपीआयचे सर्व्हर सुरळीत ( Services Restored ) असल्याची माहिती नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया ( National Payments Corporation of India) कडून देण्यात आली आहे.
-
Regret the inconvenience to #UPI users due to intermittent technical glitch. #UPI is operational now, and we are monitoring system closely.
— NPCI (@NPCI_NPCI) January 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Regret the inconvenience to #UPI users due to intermittent technical glitch. #UPI is operational now, and we are monitoring system closely.
— NPCI (@NPCI_NPCI) January 9, 2022Regret the inconvenience to #UPI users due to intermittent technical glitch. #UPI is operational now, and we are monitoring system closely.
— NPCI (@NPCI_NPCI) January 9, 2022
यूपीआयद्वारे ( Unified Payment Interface ) होणारे डिजिटल पेमेंट होत नसल्याच्या अनेक तक्रारी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर यूपीआयच्या सर्व्हरमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे डिजिटल पेमेंट होत नसल्याची माहिती एनपीसीआयकडून देण्यात आली. नागरिकांना झालेल्या अडचणींबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. आता सर्व सुरळीत असून सर्व्हरवर नजर ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - हृदयरोगींसाठी दिलासादायक बातमी..! आयआयटी कानपूरमध्ये कृत्रिम हृदयाच्या निर्मितीवर होतंय काम