ETV Bharat / bharat

UPI Outage Impacts On SBI : एसबीआयला यूपीआय, नेटबँकींगचा फटका; सेवा विस्कळीत झाल्याचा ग्राहकांचा दावा

यूपीआय आणि योनोची सेवा दुपारी ठप्प राहणार असल्याचा फटका एसबीआयच्या सेवेला बसला आहे. त्यामुळे आज सकाळपासून एसबीआयची सेवा विस्कळीत झाली आहे.

UPI Outage Impacts On SBI
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 3, 2023, 1:20 PM IST

हैदराबाद : यूपीआय आणि नेटबँकींगचा मोठा फटका एसबीआयच्या सेवेला बसल्याचे आज सकाळी दिसून आले आहे. एसबीआयची सेवा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. सर्व्हर डाऊन असल्याने अनेक ग्राहकांना आपल्या क्रेडीट कार्डचे पेमेंट करण्यात अडचण येत असल्याची ग्राहकांनी एसबीआयकडे तक्रार केली आहे. त्यामुळे यूपीआय आणि नेटबँकींगचा एसबीआय सेवेला फटका बसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

काय आहे प्रकरण : स्टेट बँक ऑफ इंडीयाची सेवा मागील तीन तासापासून विस्कळीत झाल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँकेकडे तक्रारीचा पाडाच वाचला आहे. तर काही ग्राहक आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबतची तक्रार करत आहेत. एसबीआयने आज दुपारपासून यूपीआय आणि योनो अ‍ॅपवर सेवा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. ग्राहकांनी आज सकाळीच आपले पेमेंटचे काम करायला सुरुवात केली. त्यामुळे एसबीआयच्या सर्व्हरवर मोठा ताण आल्याचे दिसून आल्याने सेवा ठप्प झाली आहे.

यूपीआय योनो पेमेंट राहणार बंद : सध्या मार्च एन्ड असल्यामुळे बँकेने आपले यूपीआय आणि योनो अ‍ॅप दुपारी 01.30 ते 04.30 वाजतापर्यंत बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या प्रलंबित देणी करण्यासाठी एकच गर्दी केल्याने आज सकाळपासून बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याची तक्रार ग्राहक करत आहेत. सध्या मार्च एन्ड असल्याने बँकेचे वार्षिक ताळेबंदाचे काम सुरू आहे.

यूपीआयला खरच लागणार शुल्क : सध्या ग्राहक ऑनलाईन व्यवहार करत असल्याने यूपीआयचा सगळ्यात जास्त वापर करतात. मात्र यूपीआयने करण्यात आलेल्या पेमेंटवर शुल्क आकारण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. मात्र यूपीआयच्या पीपीआय सेवेवर 1.1 टक्के शुल्क आकारले जाणार असल्याचेही एनपीसीआयने 24 मार्चला पत्रक जारी करुन नमूद केले होते. या फत्रकानुसार 1 एप्रिलपासून यूपीआयने बील दिल्यास 1.1 टक्के शुल्क द्यावे लागणार असल्याचे एनपीसीआयने स्पष्ट केले होते.

मार्च एन्डचा ग्राहकांना फटका : सध्या मार्च एन्ड सुरू असल्याने बँकेकडून आपले वार्षीक ताळेबंदाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेने यूपीआय आणि योनो सेवा आज दुपारी 1.30 ते 04.30 पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ही सेवा मार्च एन्ड असल्याने बँकेच्या अंतर्गत कामकाजामुळे प्रभावित झाली आहे. मात्र त्याचा फटका ग्राहकांना बसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Fact Checking Day 2023 : जगभरातील चुकीच्या माहितीवर फॅक्ट चेकींगने घातला आळा ; जाणून घ्या काय आहे फॅक्ट चेकींग डेचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.