मधुबनी : Police raped: उत्तर प्रदेशातील मऊ येथील एका अल्पवयीन मुलीवर, मधुबनी जिल्ह्यातील (Madhubani Gang Rape Case) जयनगरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात जयनगर (JAINAGAR GANGRAPE CASE) पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यासोबतच पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे.
यूपीच्या जयनगरमधील घटना : पोलिसांनी सांगितले की, सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असलेल्या इलेक्ट्रिशियन साजन कुमारला अटक करण्यात आली आहे. मधुबनी कोर्टातून त्याची कोठडी संपल्यानंतर, जयनगर पोलिसांनी त्याला यूपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. युपी पोलीसांच्या चमुने पीडितेला जवाब नोंदवण्यास सोबत नेले आहे. मुलीने दिलेल्या जवाबानुसार, जयनगर पोलीस ठाण्यातील पोलीस चालक आचार्य आणि चौकीदार रामजीवन पासवान यांचा देखील सहभाग या प्रकरणात असल्याचे समोर आले आहे. दोघांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण : गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील मऊ पोलीस स्टेशन परिसरातून एक अल्पवयीन मुलगी भटकत बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील जयनगरमध्ये पोहोचली होती. जयनगर येथील अशोक मार्केटचा नाईट गार्ड प्रमोद यादव याच्या नजरेस ती बळी पडली होती. त्यानंतर नाईट गार्डसह अनेकांनी त्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिला आमिष दाखवून एका महिलेला ५० हजार रुपयांमध्ये विकले. उत्तर प्रदेशचे पोलीस त्या अल्पवयीन मुलीच्या शोधात मधुबनीतील जयनगर येथे पोहोचले, तेव्हा ही बाब उघडकीस आली.
'गेल्या महिन्यात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील फरार आरोपींमध्ये वॉचमन रामजीवन पासवान आणि ड्रायव्हर आचार्य हे दोघेही फरार आहेत. तर चौकीदारासोबत राहणारा शहीद चौकातील साजन पासवान याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत विकत घेणाऱ्या महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे', अशी माहीती जयनगर पोलिस स्टेशनचे अमित कुमार यांनी दिली.