ETV Bharat / bharat

यूपी पोलिसांनी इराणी टोळीबाबत झारखंड पोलिसांना केले सतर्क - Palamu News

इराणी टोळीबाबत यूपी पोलिसांनी झारखंड पोलिसांना अलर्ट केले आहे. याबाबत यूपी पोलिसांनी एक पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये इराणी टोळीशी संबंधित गुन्हेगारांचे फोटो आणि माहिती देण्यात आली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 12, 2022, 10:05 PM IST

पलामू ( झारखंड ) - ईरानी गँगच्या बाबतीत उत्तर प्रदेश पोलिसांनी झारखंड पोलिसांना अलर्ट केले आहे. यूपी पोलिसांनी पलामू पोलिसांना एक पत्र पाठवले आहे. त्यात ईरानी गँगशी संबंधित गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. इराणी टोळी अत्यंत हुशारीने लुटमार, हिसकावून फसवणूक अशा गुन्हेगारी घटना घडवून आणते, असेही या पत्रात म्हटले आहे. पलामूचे एसपी चंदन कुमार सिन्हा यांनी इराणी टोळीबाबत मिळालेल्या पत्राची पुष्टी करताना सांगितले की, पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.

ही टोळी गेल्या महिन्यात यूपीच्या वाराणसीमध्ये सक्रिय होती. या टोळीतील गुन्हेगार तोतया पोलीस बनून दरोडा, स्नॅचिंगसारखे गुन्हे करत होते. दरम्यान, वाराणसी पोलिसांनी इराणी टोळीतील चार जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या इराणी टोळीच्या सदस्यांच्या खुलाशानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी झारखंड पोलिसांना अलर्ट केले आहे.

वाराणसी पोलीस आयुक्तांनी झारखंड पोलिसांना पत्र लिहून इराणी टोळीची माहिती दिली आहे. हे पत्र सुमारे 12 पानांचे आहे, ज्यामध्ये इराणी टोळीशी संबंधित गुन्हेगारांचे फोटो आहेत. वाराणसी पोलीस आयुक्त म्हणाले की, इराणी टोळी गेली 15 वर्षे भारतातील विविध भागात फिरून गुन्हेगारी घटना घडवून आणते.

इराणी टोळीत सात ते आठ जण आहेत. घटना घडण्यापूर्वी ते संपूर्ण शहराची रेकी करतात व घटना घडवून आणल्यानंतर काही तासांतच ते शहरातून पळून जातात. उत्तर प्रदेश पोलिसांच्या पत्रात इराणी टोळीतील एकही सदस्य बाहेरचा नसल्याचे सांगण्यात आले होते. टोळीतील सर्व गुन्हेगार एकमेकांशी संबंधित आहेत. ही टोळी सध्या झारखंड आणि बिहारमधील अनेक भागात सक्रिय असून या टोळीशी संबंधित गुन्हेगार पकडले गेल्यास उत्तर प्रदेश पोलिसांना कळवा, असेही या पत्रात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Babul Supriyo Sworn : पश्चिम बंगाल विधानसभेचे उपसभापती म्हणून बाबुल सुप्रियो यांनी घेतली शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.