टिहरी (उत्तराखंड) - देवभूमि (उत्तराखंड) मध्ये जर कुणाला 'हिंदू'ची परिभाषा माहित नसेल तर त्या पक्षाला सत्तेत येण्याचा अधिकार नाही असायला हवा, असे मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे. ( UP CM Yogi Adityanath ) राज्यात 14 फेब्रुवारीला विधानसभेची निवडणूक होत आहे. ( Uttarakhand Assembly Election 2022 )आज (शनिवारी) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यामुळे भाजपच्या स्टार प्रचारकांनी ( Bjp Star Campaigner in Uttarakhand ) सत्तेत पुन्हा येण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडमधील टिहरी येथे एक जनसभेला संबोधित केले. ( UP CM Yogi Adityanath in Tihari )
हिंदू शब्द नाही तर आमची संस्कृती -
योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस डूबणारे जहाज आहे. संपूर्ण देशातून काँग्रेस नाहीशी झाली आहे. जिथे थोडी जागा उरली आहे तिथे दोन्ही भाऊ आणि बहीण (राहुल आणि प्रियांका) पूर्ण करत आहेत. ते म्हणाले, हिंदू सांप्रदायिक शब्द नाही तर आमची सांस्कृतिक ओळख आहे. आपण जिथे जातो तिथे यावरूनच आपली ओळख होते.
उत्तराखंडच्या सुरक्षेसाठी भाजप आवश्यक -
योगी यावेळी म्हणाले, उत्तरप्रदेश आज गुन्हेमुक्त झाला आहे. उत्तराखंडमध्येही भाजप सरकार आवश्यक आहे कारण उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारांवर कारवाई केली तर शेजारील राज्य असल्याने ते उत्तराखंडच्या दिशेने येतील. ते पुढे म्हणाले की, यूपीमध्ये गुन्हेगारांना सोडत नाही, पण तरीही ते उत्तराखंडमध्ये पळून जात असतील, तर उत्तराखंडच्या सुरक्षेसाठी भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे.
उत्तराखंड वीरांची भूमी -
योगी यावेळी म्हणाले, उत्तराखंडमध्ये धार्मिक पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. उत्तराखंडमधील भाजप सरकार या दिशेने वाटचाल करत आहे. वाराणसीप्रमाणेच भव्य केदार धामची पुनर्बांधणी केली जात असून लवकरच बद्रीनाथ धामचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. पाचवे धाम म्हणून राज्यात लष्करी धामही बांधण्यात येणार आहे. देवभूमीशिवाय उत्तराखंड ही वीरांची भूमी आहे. इथे प्रत्येक घरातून एक व्यक्ती सैन्यात तैनात आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.