प्रयागराज (उत्तरप्रदेश): माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी पोलिस आयुक्तांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीने केलेल्या प्राथमिक तपासानंतर पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी शहागंज पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक, दोन हवालदार आणि धुमनगंज पोलिस ठाण्याचे दोन हवालदार यांना निलंबित केले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि हल्ल्याच्या वेळी प्रभावी प्रत्युत्तराची कारवाई न केल्यामुळे या सर्वांना निलंबनाची शिक्षा झाली आहे.
अशी झाली होती हत्या: अतीक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम उर्फ अश्रफ यांना कोठडी रिमांड दरम्यान शनिवारी कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले. ते दोघे पोलिस जीपमधून खाली उतरले आणि हॉस्पिटलमध्ये जात असताना मीडियाच्या वेशात आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेच्या वेळी मीडियाचे अनेक लोक घटनास्थळी उपस्थित असल्याने ही घटना त्यांच्या कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ आणि प्राथमिक तपासाच्या आधारे पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रत्त्युत्तराची कारवाई केली नाही: पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी शहागंज पोलिस ठाण्याचे प्रभारी अश्वनी कुमार सिंह तसेच धुमनगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रीत पांडे, धूमनगंज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवप्रसाद मौर्य, हवालदार जयेश कुमार आणि कॉन्स्टेबल संजय प्रजापती यांना निलंबित केले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि हल्ल्याच्या वेळी प्रभावी प्रत्युत्तराची कारवाई न केल्यामुळे या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.
तत्परता दाखवली नाही: अतिक अहमद आणि अशरफ यांच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान, शहागंज पोलिस स्टेशन प्रभारी यांना माफिया आल्यावर त्यांच्या परिसरात असलेल्या रुग्णालयाभोवती विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, 15 एप्रिलच्या रात्री माफिया बंधूंची हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांडाच्या व्हिडीओ फुटेजच्या आधारे तपास केला असता स्टेशन प्रभारी आणि इतर पोलीस कर्मचारी तिथे असतानाही तत्परता दाखवू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा: श्रद्धा हत्याकांडाबाबत हायकोर्टाकडून मोठा निर्णय,आता