ETV Bharat / bharat

तालिबानने जिंकला अफगाणिस्तान ... संयुक्त राष्ट्रसंघाने आज बोलाविली आपात्कालीन बैठक - Taliban conquers Afghanistan

तालिबानी हे अफगाणिस्तानमध्ये सत्तेचा दावा करणार आहेत. अशा स्थितीत युएनएसची आपत्कालीन बैठक ही महत्त्वपूर्ण असणार आहे.

UNSC convenes emergency meeting
UNSC convenes emergency meeting
author img

By

Published : Aug 16, 2021, 3:52 PM IST

हैदराबाद - तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्याने तेथील परिस्थिती चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषेदेने(युएनएस) आज आपत्कालीन बैठक बोलाविली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत 5 कायमस्वरुपी देश आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि चीनचा समावेश आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी झमीर काबुलोव्ह यांनी यांनी माध्यमांशी बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. तालिबानींनी रशिया आणि इतर देशांना सुरक्षा मोहिम सुरू ठेवण्याची परवानगी देऊ, असे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे. काबुलमधील दुतावास कार्यालय रिकामे करण्यात येणार का, याबाबतही त्यांनी पुष्टी दिली नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक महत्त्वाची-

तालिबानी हे अफगाणिस्तानमध्ये सत्तेचा दावा करणार आहेत. अशा स्थितीत युएनएसची आपत्कालीन बैठक ही महत्त्वपूर्ण असणार आहे. जगभरातील 193 जागतिक संस्थांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. असे असले तरी तालिबानींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतकार्यात कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे काबुलमध्ये 2002 पासून कार्यालय आहे. ते उनामा नावाने ओळखले जाते.

हेही वाचा-'...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'; अफगाण तालिबानचा भारताला इशारा

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव गटेरर्स यांना अफगाणिस्तानमधील स्थितीबाबत चिंता-

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अॅन्टिनिओ गटेरर्स म्हणाले, की अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या परिस्थितीमुळे शेकडो नागरिकांना पळून जाण्यास भाग पडले आहे. तर मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. सर्व अत्याचार थांबवायला पाहिजेत. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क विशेषत: महिला आणि मुलींना अत्यंत कष्टाने मिळालेल्या अधिकारांचे जतन करायला पाहिजे. मला अफगाणिस्तानमधील स्थितीबाबत चिंता वाटत आहे. तालिबानी आणि इतरांना माझी विनंती आहे, त्यांनी लोकांच्या प्राणाचे संरक्षण करावे व मानवी हक्कांची खात्री द्यावी. अफगाणिस्तानमध्ये शांततापूर्ण तडजोडी आणि सर्व अफगाणिस्तानी नागरिकांकरिता मानवी हक्कांना चालना देण्याकरिता योगदान देण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केले आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळाले

रक्तपात टाळण्याकरिता अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी देशातून काढला पळ-

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून पळून गेले आहेत. त्यानंतर काही तासांनी त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, की रक्तपात टाळण्याकरिता देश सोडून गेलो आहे. तालिबानींनी मला काढून टाकण्यासाठी केले आहे. ते सर्व काबुलमध्ये आणि काबुलमधील लोकांवर हल्ला करणार आहेत. घनी यांनी त्यांचा ठावठिकाणा पोस्टमध्ये सांगितला नाही.

हेही वाचा-अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे अंतरिम सरकार स्थापन, अली अहमद जलाली सत्तेत येण्याची शक्यता

अब्दुल घनी होणार अफगाणिस्तानचे राष्ट्रपती

रिपोर्टसच्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे नेतृत्व हे मुल्लाह अब्दुल घनी बारादार करणार आहेत. 53 वर्षीय बारादार हे कंदाहारमध्ये लहानाचे मोठे झाले. अब्दुल घनी हे तालिबानी संघटनेचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्यासोबत मुल्लाह मोहम्मद ओमर हे तालिबानी संघटनेचे संस्थापक आहे. बारादार यांनी पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी 2010 मध्ये अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या विनंतीनंतर त्यांना 24 ऑक्टोबर 2018 मध्ये पाकिस्तानची मुक्तता केली. बारादार हे तालिबानच्यावतीने सरकारसोबत करण्यात येणाऱ्या वाटाघाटींचे नेतृत्व करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि नागरिकांचे भवितव्य अधिक चांगले राहिल, असे बारादार यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओमधून सांगितले आहे.

अमेरिकेने सैन्य काढून घेण्याचे जाहीर केल्यानंतर तालिबांनींचे फावले...

गेली दोन दशके अफगाणिस्तानमध्ये तालिबानींचे वर्चस्व कमी झाले होते. मात्र, अमेरिकेने दोन दशकानंतर अफगाणिस्तानमधून सैन्यदल काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. तालिबानी योद्धांनी काबुलवर कब्जा मिळाला आहे. पोलीस पळून गेल्यानंतर तालिबानींनी विविध नाक्यांवर कब्जा घेतला आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी लुटीच्या घटना झाल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहे. घरे बंद करून राहावे, असे सोशल मीडियामध्ये अफगाणिस्तानी नागरिकांना सल्ले देण्यात येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.