मुंबई - देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) सोमवारी एक नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. (ICMR latest guidelin on Covid-19 stated) कोविड चाचणी कोणाला करणे आवश्यक आहे आणि कोणाला नाही हे यामध्ये सांगितले आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. (COVID 19 PATIENTS NEED NOT BE TESTED ICMR) मात्र, कोरोनाची लागण (COVID 19 PATIENTS) झालेल्या व्यक्तीला गंभीर आजार असेल किंवा त्यांचे वय जास्त असेल आणि तुम्ही जर त्यांच्या संपर्कात आलेले असाल तर तुम्ही चाचणी करावी असही सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी होणार
यावेळी (ICMR)ने दिलासा देण्याचेही काम केले आहे. संक्रमित रूग्णांच्या संपर्कात येणारे सर्व लोकांनी घाबरू नये. त्यांना कोरोना चाचणीची गरज नाही. यामध्ये गंभीर आजार असलेल्यांच्या संपर्कात आले असाल तरच चाणी करा असे सांगण्यात आले आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी मात्र केली जाणार आहे असही सांगण्यात आले आहे.
ऑक्सिजनच्या पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला
याबरोबरच होम आयसोलेशनच्या नियमांनुसार जे बरे झाले आहेत किंवा रुग्णालयातून घरी परतले आहेत तसेच, जे इतर राज्यातून प्रवास करून परत आले आहेत अशा लोकांनाही कोविड चाचणी करण्याची गरज नाही असही या मार्गदर्शक तत्तांत म्हणटले आहे. कोरोनो रुग्णांतील वाढ पाहता सोमवारी (दि. 10 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
रोजचा वाढता दर 13.29%
भारतात, गेल्या २४ तासांत कोविडचे १,७९,७२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी संक्रमणाच्या 12.6% जास्त दराने केसेस 3,57,07,727 वर गेला आहे. दरम्यान, भारतातील एकूण सक्रिय केसेस 7,23,619 आहे. एकूण संक्रमणांपैकी 2.03% सक्रिय प्रकरणे आहेत. सध्या रोजचा वाढता दर 13.29% आहे.