ETV Bharat / bharat

Gajendra Singh Shekhawat Case: केंद्रीय मंत्री शेखावत यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण - मंत्री गजेंद्र सिंह शेखावत सिरोही पोलीस

Gajendra Singh Shekhawat Case केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात राजस्थानमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Gajendra Singh Shekhawat Case
Gajendra Singh Shekhawat Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 10:37 PM IST

जयपूर Gajendra Singh Shekhawat Case- केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. खोटी भाषणे देऊन शहरातील वातावरण बिघडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात सिरोही कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिरोहीचे रहिवासी भरत कुमार यांनी येथे केंद्रीय मंत्री शेखावत यांच्या भाषणाबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. शेखावत यांच्याविरोधात कलम २९५ अ, १५३ अ, ५०५ आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सिरोही येथील रहिवासी भरत कुमार यांनी केंद्रीय मंत्र्याविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीत भरत कुमार यांनी केंद्रीय मंत्र्यांवर खोटे भाषण करून शहरातील वातावरण बिघडवल्याचा आरोप केला. तक्रारदार भरत कुमार, पन्नाराम यांचा मुलगा सिरोही येथील रहिवासी धवल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, रामझारोखा मैदानावर भारतीय जनता पार्टीतर्फे शहर परिवर्तन यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आलं होते.

  • मेरे शांति प्रिय सिरोही क्षेत्र को नफरत की तिली से जलाने का जो घिनौना प्रयास केंद्र की भाजपा सरकार के मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत ने किया है, उसे सिरोही की जनता माफ नही करेगी।

    मैने रामनवमी शोभायात्रा का जिला कलक्टर और जिला पुलिस अधीक्षक की मौजूदगी में फूलों से स्वागत किया था।… pic.twitter.com/0j2ZM5wsNl

    — Sanyam Lodha (@SanyamLodha66) September 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हटलयं पोलीस तक्रारीत? 11 सप्टेंबर रोजी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होते. सर्वसाधारण सभेच्या आयोजनासाठी भाजपाच्या विधी सेलचे हरजीराम चौधरी यांच्यावतीने एसडीएमकडून मंजुरी घेण्यात आली. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जाहीर सभेत भाषण देताना सिरोहीमध्ये रामनवमी यात्रेदरम्यान दगडफेक, पेट्रोल बॉम्ब फेकले, दुकाने जाळण्यात आली, असा आरोप केला. मात्र, प्रत्यक्षात सिरोही शहरात रामनवमी यात्रेदरम्यान अशी घटना कधीच घडली नव्हती, असे तक्रारदाराने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलय. या भाषणाची व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

भाषणाचा व्हिडिओ व्हायरल- विधानसभा निवडणुकीत बेकायदेशीर जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि शहरातील शांतता आणि कायदा सुव्यस्था बिघडवण्यासाठी विधानसभेत खोट्या गोष्टी बोलल्याल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हे भाषण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार द्वेष पसरविणारे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा-

  1. Crypto Ponzi Scam : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची ओडिशा पोलिसांकडून होणार चौकशी? काय आहे प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.