नवी दिल्ली: उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने देशातील ९६ तपास अधिकाऱ्यांचा गौरव होणार असून त्यात महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी या विशेष पदकांची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री पदकविजेत्यांमध्ये सीबीआयचे १५ तपास अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील ११ अधिकारी, उत्तर प्रदेश पोलीस दलातील १० अधिकारी, केरळ पोलीस दलातील ९ अधिकारी, मध्य प्रदेश पोलीस दलातील ८ अधिकारी, दिल्ली व कर्नाटक पोलीस दलातील ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात १३ महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
या पदकासाठी महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांची निवड झाली झाली आहे. त्यात मुंबईतील पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय तसेच पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, अजित पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक निरीक्षक राणी काळे, मनोज पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, दिलीप पवार, दीपशिका वारे, सुरेशकुमार राऊत, जितेंद्र वनकोटी, समीर अहिरराव या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : Har Ghar Tiranga जीआरपी व सीआरपीएफ रेल्वे पोलीसांच्या वतीने जल्लोषात अमृत महोत्सव साजरा