नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी साखर कारखानदारांची मंगळवारी बैठक घेतली. यावेळी साखर कारखानदारांचे 14 प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी अमित शाह यांची नॉर्थ ब्लॉकमध्ये सायंकाळी 4 वाजता भेट घेतली आहे. यावेळी बैठकीत साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.
बैठकीत केंद्रीय कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदन भोसले आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमदार राहुल कुल, विधानपरिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडीक उपस्थित होते.
स्वाभिमानीची मंगळवारी ऊस परिषद-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद महाराष्ट्रातील जयसिंगपूर येथे पार पडत आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने शेतकरी या ऊस परिषदेत सहभागी होत असतात. याही वर्षी मोठ्या संख्येने शेतकरी या परिषदेत सहभागी झाले आहे. स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे एकरकमी एफआरपीसह आता अधिक कितीची मागणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा-शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट
केंद्र सरकारकडून उसाला आजपर्यंतचा सर्वाधिक एफआरपी
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) ऊसाच्या किमान हमीभाव (एफआरपी) वाढून प्रति क्विटंल 290 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषेदत 25 ऑगस्टला दिली होती. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विटंल किमान 290 रुपये भाव द्यावा लागणार आहे. मात्र, हे 10 टक्के रिकव्हरीवर (उत्पादक क्षमता) अवलंबून असणार आहे. जर शेतकऱ्यांची रिकव्हरी 9.5 टक्क्यांहून कमी असेल तर एफआरपी ही 275 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी उत्पादक क्षमता वाढवावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केली होती.
हेही वाचा-हे देवा! या सरकारला एफआरपीचे तुकडे न करण्याची सद्बुद्धी दे- राजू शेट्टी
गतवर्षी सुमारे 70 लाख टन साखरेची निर्यात
पीयूष गोयल म्हणाले होते, की देशातील उत्पादन क्षमता वाढत आहे. उसापासून साखरेचे उत्पादन घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. गतवर्षी साखरेची विक्रमी निर्यात झाली. गतवर्षी सुमारे 70 लाख टन साखरेची देशामधून निर्यात झाली आहे.