ETV Bharat / bharat

Union Budget 2023 : बजेटमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आहे तरतूद, जाणून घ्या सविस्तर

2023 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांना मोठी भेट देणारी बजेट योजना जाहीर केली आहे. आता 2 लाख रुपयांपर्यंतचे महिला सन्मान बचत पत्र महिलांना खरेदी करता येणार आहे. यावर वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज दिले जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख करण्यात येणार आहे.

Union Budget 2023
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना
author img

By

Published : Feb 1, 2023, 2:28 PM IST

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी बचत योजना जाहीर केली. त्यांनी महिला सन्मान बचत पत्रासंदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली. अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, 2 लाखांच्या बचतीवर 7.5% व्याज दिले जाईल. तसेच 2 वर्षांसाठी 2 लाखांची गुंतवणूक केली जाईल. त्याचबरोबर वृद्धांसाठी बचतीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. SCSS (ज्येष्ठ नागरिक बचत योजना) मध्ये बचत मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. वृद्धांसाठी बचतीची व्याप्ती 30 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशाच्या अमृतकाळात महिलांसाठी नवीन बचत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ दोन वर्षांसाठी घेता येईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. दोन वर्षांचा हा कालावधी मार्च 2025 मध्ये पूर्ण होईल. म्हणजेच मार्च 2025 पर्यंत महिला 2 लाख रुपयांपर्यंतची महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खरेदी करू शकतात. यावर वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज दिले जाईल. गरज पडल्यास या रकमेचे अंशत: पैसे काढता येतात.

महिला बचतगटांचे सबलीकरण : निर्मला सीतारमण यांनी बजेटमधून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी ८१ लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन योजना आखण्यात येत आहेत, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा : त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिक या योजनेत कमाल 4.5 लाख रुपयांऐवजी 9 लाख रुपयांपर्यंत जमा करू शकतील. त्याचवेळी, ज्येष्ठ नागरिक संयुक्त खाते जास्तीत जास्त ठेव रकमेची मर्यादा 15 लाखावरुन 30 लाख रुपये करण्यात आली आहे. मोदी सरकारने 1 जानेवारी 2023 पासून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8% पर्यंत वाढवला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले आहे की, आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक बचत योजना, वृद्धांसाठी गुंतवणूक योजना 15 लाख रुपये होती, जी 30 लाख रुपये करण्यात येत आहे.

हेही वाचा : Agriculture Budget 2023 : कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' महत्वाच्या घोषणा... जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.