ETV Bharat / bharat

Health budget 2023 : औषध संशोधनासाठी नवीन योजना; 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये केली जातील स्थापन

author img

By

Published : Feb 1, 2023, 11:17 AM IST

Updated : Feb 1, 2023, 3:44 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी देखील घोषणा करण्यात आल्या. 0-40 वयोगटातील व्यक्तींचे हेल्थ स्क्रिनिंग होणार आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन देणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. तर 157 वैदकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे.

Health budget 2023
यंदाच्या अर्थसंकल्पात काय असतील आरोग्य क्षेत्रासाठी घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या वर्षभराच्या व्यवहाराची दिशा या अर्थसंकल्पातून निश्चित होते. विविध घटकांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद केली आहे. हे यामधून समजते. त्यामुळे विविध क्षेत्र विविध घटक यांची अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहे. त्या संदर्भात ईटीव्ही भारतने जाणून घेतले आहे. विमा, लस, तंत्रज्ञान आणि संशोधन आणि विकास यासह आरोग्य सेवा मंत्रालयातील विविध क्षेत्रांना सामोरे जाण्यासाठी 2023 च्या अर्थसंकल्पाचा मसुदा 20-30 टक्क्यांच्या वाढीसह तयार करण्यात यावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. औषध संशोधनासाठी नवीन योजना आणण्यात येणार आहे. आरोग्य आघाडीवर, एफएम म्हणाले की बजेटमध्ये नवीन नर्सिंग महाविद्यालयांना आयसीएमआर ( ICMR ) सुविधा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

157 नवीन नर्सिंग महाविद्यालये : 2015 पासून स्थापन झालेल्या विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सह-स्थानावर 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील, असेही त्या म्हणाल्या. 2014 पासून स्थापन झालेल्या विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सह-स्थानावर 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील. 2047 पर्यंत सिकलसेल ॲनिमिया दूर करण्याचे मिशन राबविण्याचीही सरकारची योजना आहे. वैद्यकीय संशोधनात, सर्व आयसीएमआर ( ICMR ) लॅबमध्ये सार्वजनिक आणि खाजगी वैद्यकीय सुविधांद्वारे संशोधनासाठी सुविधा असतील. सर्व सेंटर्स ऑफ एक्सलन्समध्ये फार्मास्युटिकल्समधील संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी नवीन कार्यक्रम असतील.

Health budget 2023
157 नवीन नर्सिंग महाविद्यालये केली जातील स्थापन

वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन : आरोग्याच्या विकासासाठी विशेष भर देण्यात आली आहे. सीतारमण यांनी ही माहिती दिली आहे. तर 157 वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे. तसेच संशोधनावर भर देण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा बनवण्यात येणार आहे.

2027 पर्यंत ॲनिमियावर करणार मात : भारतीय महिला अ‍ॅनिमिया सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवते. या समस्येवर 2027 पर्यंत ॲनिमियावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार : सर्व शहरांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात मॅनहोलचं रुपांतर मशीन होलमध्ये करणार आहे. हाताने मैला उचलण्याची पद्धत बंद करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली आहे.

220 कोटी नागरिकांना कोरोनाची लस : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारने 220 कोटी नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. संशोधनावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी सास्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र काम करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक साक्षरतेला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. अनेक आजारांचे मूळ कारण हे पाणी आहे. त्यामुळे बजेटमध्ये स्वच्छ पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज अर्थसंकल्प मांडला. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प होता. मोदी सरकारचा हा एकूण नववा अर्थसंकल्प आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा तसेच या वर्षात आठ ते दहा राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.

हेही वाचा : Union Budget 2023: महाराष्ट्रातील शेती, उद्योजक आणि कामगार संघटनांच्या अर्थसंकल्पाकडून या आहेत अपेक्षा

Last Updated : Feb 1, 2023, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.