ETV Bharat / bharat

मृत्यूची ठरली अफवा! कोरोनातून बरे झाल्याने छोटा राजनची रुग्णालयातून सु्ट्टी - छोटा राजन न्यूज

एम्स ट्रामा सेंटरमध्ये छोटा राजनला दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे.

छोटा राजन
छोटा राजन
author img

By

Published : May 11, 2021, 7:57 PM IST

नवी दिल्ली - गुन्हेगारी जगतामध्ये अंडरवर्ल्ड डॉन म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्याला एम्स रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

छोटा राजनला एप्रिलध्ये कोरोना झाल्याचे निदान झाले होते. एम्स ट्रामा सेंटरमध्ये छोटा राजनला दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे. विविध गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉनची रुग्णालयामधून थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. नुकतेच त्याच्या मृत्यूची अफवा पसरली होती.

हेही वाचा-32 हजार पुश पिनच्या सहायाने पोर्ट्रेट काढून कोरोना योद्ध्या परिचारिकांना मानवंदना

मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने दहा वर्षांची ठोठावली शिक्षा

मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला खुनाच्या प्रयत्नाच्या खटल्यात दहा वर्षाच्या तुरुंगवासाची मार्च 2021 मध्ये शिक्षा सुनावली. 2013 मध्ये अजय गोसालिया या बुकीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोर्टाने छोटा राजनला दहा वर्षांची शिक्षा सुनावली.

हेही वाचा-तेलंगाणामध्ये १२ मेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

पत्रकार जे डे खून प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा
राजेंद्र निकळजे उर्फ ​​छोटा राजन नावाचा हा कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार सह-आरोपींसह दोषी आढळला. त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तक्रारदारानुसार, 52 वर्षीय अजय गोसालिया उर्फ ​​गेंडा प्रथम बुकी होता. नंतर तो बिल्डर बनला. 28 ऑगस्ट 2013 रोजी त्याला तीन जणांनी गोळ्या घातल्या. हा हल्ला मुंबईतील मालाड मधील इन्फिनिटी मॉल बाहेर करण्यात आला होता. राजनला बाली येथून भारतात आणल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. छोटा राजनला यापूर्वी पत्रकार जे डे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.