लखनऊ - केंदीय औषध संशोधन संस्था (सीडीआरआय) लखनऊ यांनी कोरोनावर मात करणाऱ्या औषधाचा शोध लावला आहे. येथील शास्त्रज्ञांनी उमिफेनोविर औषधाच्या (umifenovir drug) तिसऱ्या टप्पातील क्लिनिकल ट्रायल हे यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की उमिफेनोविर हे कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या आणि लक्षणविरहीत रुग्णांवर उपचारात प्रभावशाली ठरले आहे. तर मध्यम आणि जास्त जोखिम असलेल्या रुग्णांच्या उपचारातही मदतगार आहे. तसेच हे औषध पाच दिवसात व्हायरलचा नायनाट करण्यात सक्षम आहे.
या संस्थांमध्ये चालले ट्रायल -
सीडीआरआय निदेशक प्रो. तपस कुंडू यांनी सांगितले की, औषधी महानिदेशक (डीसीजीआय)ने गेल्या वर्षी जूनमध्ये या प्रकल्पासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर केजीएमयू, एरा लखनऊ मेडिकल कॉलेज आणि राम मनोहर लोहिया इंस्टीट्यूट ऑफिस सायन्सेसमधील रूग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला होता. हे तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल होते. यामध्ये उमीफेनोविर हे यशस्वी राहीले.
डेल्टा व्हेरिअंटवर देखील प्रभावी -
निदेशक प्रो. कुंडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमिफेनोविर हे गोळीच्या रूपात सध्या आहे. याला औषध आणि इनहेलरच्या रूपात सुद्धा विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी सांगितले की, ट्रायलच्या वेळी असे रूग्णही यामध्ये समाविष्ट होते. ज्यांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग झालेला होता. असे आपण ग्रहित धरू शकतो की, हे औषध डेल्टा व्हेरिअंटवर देखील प्रभावीपणे काम करेल, कारण की डेल्टा व्हेरिअंटच्या 132 रूग्णांचा क्लिनिकल ट्रायल करण्यात आले होतो. त्या रूग्णावर उमिफेनोविरने प्रभावीपणे काम करून कोरोनाच्या सेल कल्चरला नष्ट केले. हे औषध शरीरात व्हायसरला प्रवेश करण्यापासून प्रतिकार करते. 5 दिवसाच्या औषधाचा खर्च केवळ 600 रुपयापर्यंत येऊ शकतो.
हेही वाचा - कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून चालू आठवड्यात मिळणार मान्यता