कीव - युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला एक महिना पूर्ण झाला आहे. आज युद्धाचा ३१ वा दिवस आहे. लढा सुरूच आहे. युक्रेनमधील विध्वंस थांबत नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले. हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे आहे. पोलंडच्या सीमेला भेट देताना, त्यांनी काही अमेरिकन सैनिकांचीही भेट घेतली. मानवतावादी मदतीसाठी आणि नाटोच्या पूर्वेकडील पोलंड सीमेवर अमेरिकन सैन्य पाठवण्यात आले आहे. बायडेन यावेळी म्हणाले, युरोप दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या निर्वासित संकटाचा सामना करत आहे.
पोलंडचे कौतुक - रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणातून पळून गेलेल्या २० लाखांहून अधिक निर्वासितांना आश्रय दिल्याबद्दल जो बायडेन यांनी पोलंडचे कौतुक केले. बायडेन यांनी मानवतावादी तज्ञांची भेट घेऊन लोकांच्या वाढत्या समस्यांवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे यावर चर्चा केली. दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवर संभाषण केले. अनेक मुद्द्यांवर सुमारे एक तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही यात समावेश आहे.