ETV Bharat / bharat

कौतुकास्पद! उज्जैनमध्ये लग्नात मुलीला भेटवस्तू म्हणून दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स

author img

By

Published : Jul 4, 2021, 12:20 PM IST

लग्न म्हटलं की भेटवस्तू आल्याच. आतापर्यंत लग्नांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि महागड्या भेटवस्तू दिल्या जायच्या. यामध्ये आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचाही समावेश झालाय. उज्जैनच्या सेवा धाम आश्रमातील गोयल कुटुंबातील ज्येष्ठ मुलीच्या लग्नात भेटवस्तू म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यात आले आहे.

ujjain-family-gave-two-oxygen-concentrator-as-dowry-with-8-promises

उज्जैन - देशभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे उद्भवलेली गंभीर आपण पाहिली. उपचार आणि ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेतील परिस्थितीमुळे सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी स्वतःच काळजी घेणं गरजेचं आहे, अशी भावना लोकांमध्ये दिसून येत आहे. याचाच प्रत्यय एका लग्नात आला आहे. लग्न म्हटलं की भेटवस्तू आल्याच. आतापर्यंत लग्नांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि महागड्या भेटवस्तू दिल्या जायच्या. यामध्ये आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचाही समावेश झालाय. उज्जैनच्या सेवा धाम आश्रमातील गोयल कुटुंबातील ज्येष्ठ मुलीच्या लग्नात भेटवस्तू म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यात आले आहे. गोयल परिवाराने मुलीला 1.40 लाख रुपये किमतीचे दोन कॉन्सन्ट्रेटर्स दिले आहेत. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या भेटवस्तूचे लोकांनी कौतुक केले आहे.

उज्जैनमध्ये लग्नात मुलीला भेटवस्तू म्हणून दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स..

1 लाख 40 हजार रुपयांचे कॉन्सन्ट्रेटर्स -

गोयल कुटुंबीयांनी वधू-वरांना दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भेट म्हणून दिल्या आहेत. त्यांची किंमत 1.40 लाख रुपये आहे. आश्रमाचे संचालक सुधीर भाई गोयल यांची मोठी मुलगी, मोनिकाचे पुण्यात सहाय्यक सीए म्हणून काम केलेल्या अंकितशी लग्न झाले होते. या लग्नात अनेक पारंपारिक प्रथांना नाकारले. सहसा लग्नात नवरदेव-नवरी सात वचन घेतात. मात्र, या लग्नात आठ वचन घेण्यात आले. आठवे वचन हे कॉन्सन्ट्रेटर्स साठी होते. म्हणजेच जर कधी कुणाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची गरज पडेल तर ते मोफत देण्यात येईल. ही वधू गेल्या २५ वर्षांपासून मूक-बधिर आणि अनाथ मुलांची सेवा करत आहे.

तसेच या विवाहात कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात आले. या लग्नात अनेक पर्यावरणप्रेमी देखील होते. वरातीत आलेल्या २० जणांनी वृक्षारोपण केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.