ETV Bharat / bharat

Uddhav Thackeray : बाबरी मशीद प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर हल्ला; म्हणाले, राजीनामा...

author img

By

Published : Apr 11, 2023, 2:23 PM IST

Updated : Apr 11, 2023, 3:49 PM IST

बाबरी मशीद पाडण्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलेच वादयुद्ध रंगले आहे. बाबरी पाडण्यावेळी शिवसेनेचा एकही कार्यकर्ता तिथे हजर नव्हता, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी पाटलांना लगावला आहे.

Uddhav Thackeray Press Conference
उध्दव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर केला हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई : सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. या दौऱ्यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबरी मशीद वाद आणि बाळासाहेब ठाकरे या विषयावर गंभीर वक्तव्य केलं. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपचा समाचार घेतला आहे.

चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे : भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले होते. एकीकडे मोहन भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांनीसुद्धा राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेब म्हणाले होते की हे कसले नपुंसक नेतृत्व आहे. आता एक-एक बिळातून बाहेर येत आहेत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

उद्धव ठाकरेंचा मिंधेंवर हल्लाबोल : मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांची हिंमत झाली नाही. शेवटी निकाल कोर्टाने दिला आहे. मिंधेंना बाळासाहेबांचे, शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी : बावनकुळेवगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाहीत. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसते ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवला आहे. ते सहन होत नाही म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी आहे. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व आहे. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाचा बुरखा घातला आहे, त्यात आता त्यांचा अत्यंत विकृत चेहरा समोर आला आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : बाबरी विध्वंसाशी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त दाव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, जर मुख्यमंत्री शिंदे हे चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेऊ शकत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा : FM Sitharaman : डब्ल्यूटीओ अधिक प्रगतीशील, इतर देशांचे अधिक ऐकणारे व्हावे अशी भारताची इच्छा - निर्मला सीतारामन

Last Updated : Apr 11, 2023, 3:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.