नवी दिल्ली : छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. कोश्यारींविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. शिवरायांबाबत मोजून मापून ( MH gov controversial remark ) बोलावे. राष्ट्रपती कार्यालयाने प्रकरण गृहमंत्रालयाकडे दिल्याची माहिती दिली. राज्यपालांविरोधात कारवाई होण्याची खात्री आहे. याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही. राष्ट्रपती कार्यालयाने पत्राची दखल घेतली आहे. राज्यपालपदाचा मान राखून वक्तव्ये केली पाहिजेत. थोरांचा अपमान केला तर तसा पायंडा पाडेल, असे उदयनराजे यांनी म्हटले.
राज्यपाल हटवण्याची मागणी : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराजां बाबत (Chhatrapati Shivaji Maharaj ) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभर राज्यपाल हटवण्याची मागणी ( Demand for ouster of Governor Koshyari) करण्यात आली होती. विविध संघटना विरोधी पक्षाकडून राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहेत.
पदावरून हटवण्याची आक्रमक : छत्रपती शिवरायांचा अपमान होणारे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षांत संताप आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची आक्रमक मागणी केली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari ) भाजपचे असूनही खासदार उदयनराजे यांनी पक्षश्रेष्ठींना यावरून इशारा दिला होता. राज्यपालांविरोधात भाजपने कठोर भूमिका घेतली नाही, तर मी टोकाचा निर्णय घेऊ शकतो, असे उदयनराजे भोसले यांनी म्हणले होते.
महाराजांवर टीका करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांवर वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधत छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करणाऱ्या राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी केली होती. अशातच शिंदे भाजप सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधत, आता या विषयावर पडदा पडायला पाहिजे असे विधान केले होते.