ETV Bharat / bharat

रील बनवण्याचा जीवघेणा छंद, ट्रेनच्या धडकेत दोघांचा मृत्यू, तिसऱ्याने पुलावरून उडी मारून वाचवला जीव - रील बनवताना ट्रेनच्या धडकेत मृत्यू

खगरिया येथील रेल्वे पुलावर रिल बनवत असताना दोन तरुणांना रेल्वेची धडक बसली. (two youth killed by train while making reels). तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने नदीत उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत. (killed by train while making reels in khagaria). वाचा पूर्ण बातमी..

two youth killed by train while making reels

author img

By

Published : Jan 2, 2023, 9:09 PM IST

खगरिया (बिहार) : बिहारमधील खगरिया येथे ट्रेनची धडक बसून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. (two youth killed by train while making reels). मानसी-सहरसा रेल्वे मार्गावर रील बनवत असताना तीन मित्रांना ट्रेनची धडक बसली. मात्र, रेल्वेची धडक लागण्यापूर्वीच एका तरुणाने नदीत उडी मारून आपला जीव वाचवला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही तरुणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवले. तर तिसऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (killed by train while making reels in khagaria).

रील बनवताना अपघात : हे प्रकरण धामरा स्टेशनजवळील आहे. नवीन वर्षाच्या आगमनानंतर बागमती रेल्वे पुलावर रिल बनवत असताना दोन मित्रांना रेल्वेची धडक बसली. त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अन्य एका मित्राने ट्रेनच्या भीतीने पुलावरून खाली नदीत उडी मारली. त्यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला सदर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. जिथे जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. बल्हा रहिवासी नितीश कुमार आणि सोनू कुमार अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाचे नाव अमन कुमार असे आहे.

नवीन वर्षावर बनवत होते रील : या आधीही त्या तीन मित्रांनी अनेक रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड केल्याचं सांगण्यात येत आहे. रविवारी ते नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रील बनवत होते. तेव्हाच जानकी एक्सप्रेस रेल्वे ब्लॉक पुलावर आली आणि हा अपघात झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या दिवशी धामहरा येथील आई कात्यायनी मंदिरात पूजा करू असे सांगून तिघे मित्र घरातून निघाले होते. यानंतर वाटेत ते रील बनविण्यासाठी थांबले. हे रील बनवत असतानाच हा अपघात झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.