पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) - पुलवामाच्या मित्रीगाम भागात सुरू असलेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला असल्याची माहिती माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. ( Terrorist killed Pulwama Clash ) पुलवामाच्या मित्रीगाम भागात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, त्यावेळी ही कारवाई करण्यात भारतीय सैन्याला हे यश आले.
-
#PulwamaEncounterUpdate: Both killed terrorists identified as local terrorists namely Aijaz Hafiz & Shahid Ayub, of Al-Badr outfit. 02 AK rifles recovered. They had been involved in series of attacks on outside labourers in Pulwama in the month of March-April 2022: IGP Kashmir. https://t.co/Rc8ZWjV85d
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#PulwamaEncounterUpdate: Both killed terrorists identified as local terrorists namely Aijaz Hafiz & Shahid Ayub, of Al-Badr outfit. 02 AK rifles recovered. They had been involved in series of attacks on outside labourers in Pulwama in the month of March-April 2022: IGP Kashmir. https://t.co/Rc8ZWjV85d
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) April 27, 2022#PulwamaEncounterUpdate: Both killed terrorists identified as local terrorists namely Aijaz Hafiz & Shahid Ayub, of Al-Badr outfit. 02 AK rifles recovered. They had been involved in series of attacks on outside labourers in Pulwama in the month of March-April 2022: IGP Kashmir. https://t.co/Rc8ZWjV85d
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) April 27, 2022
या चकमकीत ठार झालेले दोन्ही दहशतवादी (मार्च-एप्रिल 2022)मध्ये जिल्ह्यातील बाहेरील मजुरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये सामील होते, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे. ( Vijay Kumar, Inspector General Kashmir ) या दहशतवाद्यांची ओळख एजाज हाफिज आणि शाहिद अयुब अशी झाली असून ते अल बद्र या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. हे दोघेही स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
पोलिसांनी यामध्ये दोन (AK 47) रायफलही जप्त केल्या आहेत. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP), विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जैश-ए-मोहम्मद (JeM) संघटनेच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन-तीन दहशतवादी गराड्यात अडकले होते. नागरिकांना बाहेर काढल्याने ऑपरेशन मध्येच थांबवण्यात आले.
बुधवारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - कराची विद्यापीठाजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यावरून चीन आक्रमक.. म्हणाला, 'चिनी रक्त व्यर्थ जाणारा नाही'