श्रीनगर - सैन्यदलाचे चॉपर कोसळल्याने अपघात झाला आहे. हा अपघात जम्मूमधील उधमपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात झाला आहे. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्रशिक्षणादरम्यान शिवगृह धार भागामध्ये सैन्यदलाचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळल्याचे जम्मूमधील संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना सकाळी साडेदहा ते पावणेअकरा वाजता झाली आहे. हेलिकॉप्टर हे सैन्यदलाच्या एव्हिशन कॉर्पशी संबंधित आहेत.
हेही वाचा-भरधाव कार खड्ड्यात कोसळली; श्वास गुदमरल्याने पाच जणांचा मृत्यू
पोलिसांना पोहोचण्यासाठी काही वेळ लागणार-
नॉर्थन कमांडमधील संरक्षण दलाचा प्रवक्ते म्हणाले, की सैन्य दल निवदेन जारी करणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की अपघात घडलेल्या दुर्गम भागात जाण्यासाठी पोलीस निघाले आहेत. त्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी काहीवेळ लागणार आहे.
हेही वाचा-महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान- योगी आदित्यनाथ
जळगावातील अपघातात प्रशिक्षक वैमानिकाचा झाला होता मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगलात एक ट्रेनर एअर क्राफ्ट म्हणजेच शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणारे विमान कोसळले होी. ही घटना शुक्रवारी (16 जुलै 2021 ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत प्रशिक्षक वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.