श्रीनगर ( जम्मू काश्मीर ) - मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील मगरेपोरा भागात गुरुवारी (दि. 2 जून) अतिरेक्यांनी दोन परप्रांतियांवर गोळीबार केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आज (दि. 2 जून) संध्याकाळी माग्रेपोरामध्ये दोन परप्रांतिय अतिरेक्यांनी गोळीबार केला.
एकाच्या हाताला तर दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हल्ल्यानंतर हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
हेही वाचा - कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी राजस्थानच्या बँक मॅनेजरची केली हत्या