जम्मू काश्मीर - दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील नौपोरा भागात बुधवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ( Two Militants Killed In Kulgam Encounter ) काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली. सध्या परिसरात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.
-
#UPDATE Kulgam Encounter | One more terrorist (total 2) killed. Search going on. Further details awaited. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) June 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE Kulgam Encounter | One more terrorist (total 2) killed. Search going on. Further details awaited. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) June 29, 2022#UPDATE Kulgam Encounter | One more terrorist (total 2) killed. Search going on. Further details awaited. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) June 29, 2022
पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, नौपोरा भागातील मीर बाजार भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना पळून जाण्याची संधी दिली नाही आणि चकमक सुरू झाली.
ते म्हणाले की, आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे आणि सुटण्याच्या सर्व मार्गांवर रक्षक तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
यापूर्वी काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली होती की कुलगाम जिल्ह्यातील नौपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. सुरक्षा दलांनी काही दहशतवाद्यांना घेरले आहे.
हेही वाचा - मुंबईत 2000 सीआरपीएफ जवान दाखल, एअरपोर्ट ते विधान भवन परिसरात होणार तैनात