श्रीनगर - काश्मीरच्या खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यासाठी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील अम्शीपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार ( Two Militants killed in Amshipora ) केल्याचा दावा केला आहे. घटनास्थळावरून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
-
#ShopianEncounterUpdate: 02 #terrorists killed. #Incriminating materials including arms & ammunition recovered. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/BOFVDRVrmf
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) February 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#ShopianEncounterUpdate: 02 #terrorists killed. #Incriminating materials including arms & ammunition recovered. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/BOFVDRVrmf
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) February 25, 2022#ShopianEncounterUpdate: 02 #terrorists killed. #Incriminating materials including arms & ammunition recovered. Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/BOFVDRVrmf
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) February 25, 2022
दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यानंतर सुरक्षा दल अलर्ट झाले आहे. सुरक्षा दलाने अनेक ठिकाणी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोरदार शोध मोहिम सुरू केली आहे.
हेही वाचा - आयएसआयचे षडयंत्र, 200 सामान्य लोकांची हत्या करण्याचा कट