कुपवाडा (जम्मू काश्मीर) : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दोन संशयीत अतिरेक्यांना अटक केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याचा दावा केला.
दोन संशयितांना ताब्यात - त्यानुसार, पोलिसांनी एका ट्विटमध्ये माहिती दिली की, कुपवाडा पोलीस आणि लष्कराने लादेरवान कुपवाडा येथील तालिब अहमद शेख आणि कवडी लदेरवान कुपवाडा येथील शमीम अहमद या दोन संशयीत दहशतवाद्यांना अटक केली. पोलिसांनी पुढे सांगितले की, अटक करण्यात आलेले अतिरेकी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत, तर 04 पिस्तूल, 08 पिस्तूल मॅगझिन, 130 पिस्तुल राऊंड आणि 10 हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.
"कुपवाडा पोलीस आणि लष्कराने लदेरवान कुपवाडा येथील तालिब अहमद शेख आणि कवडी लादेरवान कुपवाडा येथील शमीम अहमद म्हणून ओळखल्या जाणार्या 02 हायब्रिड दहशतवाद्यांना अटक केली, जे दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित आहेत. 04 पिस्तूल, 08 पिस्तुल मॅगझिन, 130 पिस्तुल राऊंड आणि 10 हँडग्रेनेड जप्त करण्यात आले,” काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट केले.